Exam Time Table : विद्यार्थ्यांचा वेळापत्रकावरचाच विश्वास उडाला; शाश्वत वेळापत्रकाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लेखी परीक्षा घेणार म्हणून अचानक ऑनलाईन आणि बहुपर्यायी परीक्षा घेतली. दिवाळी आधी जाहीर झालेले अधिकृत वेळापत्रक पुन्हा एकदा दिवाळीनंतर पुढे ढकलले.
Pune University
Pune UniversitySakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लेखी परीक्षा घेणार म्हणून अचानक ऑनलाईन आणि बहुपर्यायी परीक्षा घेतली. दिवाळी आधी जाहीर झालेले अधिकृत वेळापत्रक पुन्हा एकदा दिवाळीनंतर पुढे ढकलले.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लेखी परीक्षा घेणार म्हणून अचानक ऑनलाईन आणि बहुपर्यायी परीक्षा घेतली. दिवाळी आधी जाहीर झालेले अधिकृत वेळापत्रक पुन्हा एकदा दिवाळीनंतर पुढे ढकलले, एकदा पुढे ढकलेले वेळापत्रक परीक्षेच्या तोंडावर अचानक बदलले. अशा सततच्या बदलांमुळे विद्यापीठाचा सही शिक्का असलेले अधिकृत वेळापत्रकावरचाही विश्वास उडाला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जोशी या विधी विभागाच्या विद्यार्थ्याने दिली आहे.

कोरोनानंतर दीड वर्षे उलटले तरी विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक आजवर पुर्वस्थितीत आलेले नाही. त्यात परीक्षेच्या तारखांहून सातत्याने आंदोलन होते आहे. परीक्षा विभाग आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होत परीक्षा पुढे ढकलली जाते. मात्र यात सर्वसामान्य विद्यार्थ्याचे नियोजन कोलमडत आहे. विद्यापीठाने वेळापत्रक निश्चित करण्यापूर्वी सर्व शक्यतांचा एकदा विचार करायला हवा, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही त्याचे नियोजन करता येते. विद्यार्थी संघटना, विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा विभागाने या बद्दल ठोस निर्णय घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आंदोलनाचा दूसरा दिवस...

विधी विद्याशाखेतील परीक्षांच्या वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य ईमारती बाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी (ता.३) आंदोलनाचा तिसरा दिवस असून, एका विद्यार्थ्याची तब्यतही खालावली आहे. आंदोलक विद्यार्थी अक्षय चव्हाण सांगतातत, ‘‘विद्यापीठाने ९० दिवसांच्या सत्र पुर्ततेनंतरच परीक्षा ङ्यावी, रविवार आणि शनिवारचा दिवस वगळून एक दिवसाआड परीक्षा घ्यावी, अशी आमची मागणी आहे. त्या संदर्भात आणि आमरण उपोषण करत आहोत.’’

सततच्या बदलामुळे परिणाम -

- विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन कोलमडते

- प्राधअयापक घाईने शिकवून मोकळे होतात

- बाहेरगावच्या विद्यार्थअयांचे प्रवासाचे नियोजन कोलमडते

- शैक्षणिक वेळापत्रक कोलमडते

Pune University
HSC Exam Paper : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणी दोषींवर होणार कारवाई

विद्यापीठाने ९० दिवसांची सत्र पुर्ततेनंतरच परीक्षा घ्यावी. तसेच संभाव्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रवेश परीक्षा आणि एका दिवसाचा गॅप गृहीत धरूणच घेऊनच सर्वसमावेशक वेळापत्रक तयार करावे. सातत्याने वेळापत्रकात बदल केल्याने आम्ही मेटाकुटीला आलो आहे. शैक्षणिक वेळापत्रकात तातडीने सुसूत्रचा आणावी.

- भक्ती भावे, विधी विद्याशाखेची विद्यार्थीनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com