यूजीसी-नेटचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UGC NET exam

पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) दुसरा टप्पा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पार पडणार आहे.

यूजीसी-नेटचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये

पुणे - विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) दुसरा टप्पा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पार पडणार आहे. उर्वरित ६४ विषयांची नेट परीक्षा २० ते ३० सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे.

डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ ची नेट परीक्षा एकत्र करत युजीसीच्या वतीने एकच परीक्षा घेण्यात येत आहे. ३३ विषयांसाठीचा पहिला टप्पा जुलैमध्ये पार पडला. दुसऱ्या टप्प्यासाठी १२ ते १४ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता या तारखा पुढे ढकलण्यात आल्या असून, सप्टेंबर महिन्यात परीक्षा पार पडणार आहे. ११ सप्टेंबर रोजी परीक्षा केंद्र आणि १६ सप्टेंबरला प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करण्यात येईल, असे युजीसीने कळविले आहे. समाजमाध्यमांतील खोट्या संदेशापासून विद्यार्थ्यांनी दूर रहावे, व अधिकृत माहितीसाठी https://ugcnet.nta.nic.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा, अशा सूचनाही युजीसीने दिल्या आहेत.