esakal | दोन दिवसांत 'पेट'ची Merit List प्रसिध्द होणार; तब्बल 650 जागांसाठी परीक्षा I Education
sakal

बोलून बातमी शोधा

Merit List

'पेट' झाल्यानंतर मराठी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत काही त्रुटी राहिल्याने एका विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे तक्रार केली.

दोन दिवसांत 'पेट'ची Merit List प्रसिध्द होणार; तब्बल 650 जागांसाठी परीक्षा

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाअंर्तत (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) मराठी, विज्ञान, वाणिज्य, फार्मसी, पत्रकारिता यासह विविध विषयांमधून पीएचडीसाठी (Ph.D.) तब्बल 650 जागांसाठी पेट परीक्षा पार पडली. तब्बल दोन हजार 700 उमेदवारांनी अर्ज केले होते. परीक्षा होऊन महिना संपतोय, तरीही मेरिट याद्या प्रसिध्द होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे प्रतीक्षेतील उमेदवारांनी विद्यापीठाच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

कोरोना काळातील ऑनलाइन परीक्षा (Online Exam), काही दिवसांतच निकाला जाहीर करण्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने नावलौकिक मिळविला. विद्यापीठाने अनेक विद्यापीठांशी व नामवंत शिक्षण संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, परीक्षा विभाग अजूनही म्हणावा तितका गतिमान झालेला दिसत नाही. 'पेट' झाल्यानंतर मराठी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत काही त्रुटी राहिल्याने एका विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे तक्रार केली. त्यानंतर विद्यापीठाने त्या विषयाची 'पेट' पुन्हा घेतली. दरम्यान, उर्वरित विषयांच्या गुणवत्ता याद्या प्रसिध्द होऊन प्रवेशाची पुढील कार्यवाही सुरु होणार आहे. गुणवत्ता यादीत स्थानिक, बाहेरील विद्यापीठ, सेट-नेट उत्तीर्ण विद्यार्थी, मूळचे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी, परंतु त्यांचे शिक्षण बाहेरील विद्यापीठात झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून गुणवत्ता याद्या तयार करण्याची प्रक्रिया युध्दपातळीवर सुरु असल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले. एका जागेसाठी तीन उमेदवार निवडून त्यांच्या मुलाखती होऊन त्यातून एकाची निवड केली जाणार आहे. साधारणपणे 15 ऑक्‍टोबरपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

हेही वाचा: आर्मीत पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी; महिला-पुरुष दोघेही करू शकतात अर्ज

मराठीची पेट पुन्हा घेण्यात आली असून आता सर्वच उमेदवारांची जनरल मेरिट यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर विषय व आरक्षणनिहाय गुणवत्ता याद्या प्रसिध्द होतील.

-डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्र-कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

हेही वाचा: 'त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं'

उमेदवार निवडीत वशिलेबाजी नकोच

'पेट' परीक्षा पार पडल्यानंतर बाहेरील विद्यापीठ असो वा बाहेरील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून पीएचडी प्रवेशासाठी वशिलेबाजी सुरु असल्याचे बोलले जात आहे. गुणवत्ता याद्या प्रसिध्द झाल्यानंतर मुलाखती होतील, त्यातही वशिलेबाजीची शक्‍यता वर्तविली जात आहे. मात्र, दर्जेदार संशोधन व्हावे, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्‍त केली आहे.

loading image
go to top