esakal | आर्मीत पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी; महिला-पुरुष दोघेही करू शकतात अर्ज I Indian Army
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army Bharti 2021

जर तुम्ही अभियांत्रिकीचे पदवीधर असाल आणि भारतीय सैन्यात नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

आर्मीत पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी; महिला-पुरुष दोघेही करू शकतात अर्ज

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Indian Army Bharti 2021 : जर तुम्ही अभियांत्रिकीचे पदवीधर असाल आणि भारतीय सैन्यात नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. भारतीय लष्करानं सशस्त्र दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल पदांसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत SSC 58 पुरुष आणि 29 महिलांची या पदांवर निवड केली जाईल. याशिवाय, त्या महिला देखील अर्ज करू शकतात, ज्यांचे पती शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या (एसएससी) अनुदानासाठी मरण पावलेत.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया शेवटच्या दिवसापासून म्हणजेच, 28 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे, तर 28 ऑक्टोबरपर्यंत ती चालणार आहे. दरम्यान, कोणताही उमेदवार ज्याला या पदासाठी अर्ज करायचाय, ते याच कालावधीत करू शकतात. तसेच, उमेदवार अधिकृत वेबपोर्टलवरही joinindianarmy.nic.in अर्ज करू शकतात.

'या' तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात - 28 सप्टेंबर 2021

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 ऑक्टोबर 2021

हेही वाचा: SBI बँकेत पदवीधरांसाठी बंपर भरती; 600 हून अधिक पदांवर मिळणार 'नोकरी'

रिक्त पदाचा तपशील

  • एसएससी (टेक) -58 पुरुष - 175 पदे

  • SSCW (टेक) - 29 महिला - 14 पदे

  • केवळ संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा महिला - 2 पदे

अधिसूचनेनुसार, या पदांकरता अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असावा किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये शिकत असलेला पुरावा सादर करावा. तसेच या पदांसाठी अर्ज करणाऱ्या युवकांचे वय 20 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. दरम्यान, या पदासाठी अर्ज करणाऱ्या आरक्षित उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार शिथिलता दिली जाईल.

हेही वाचा: आर्मीत नोकरीची मोठी संधी! 10 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज

loading image
go to top