esakal | बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! IRCTC एजंट होऊन कमवा ५० हजार रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

IRCTC

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! IRCTC एजंट होऊन कमवा ५० हजार रुपये

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात बेरोजगारीशी लढणाऱ्या तरुणांना रेल्वेतर्फे रोजगाराची सुवर्णसंधी मिळणार आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसी (भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन विभाग) विभागात एजंट बनण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे आयआरसीटीसी एजंट म्हणून तुम्ही चांगली कमाई करु शकता. आयआरसीटीसी भारतीय रेल्वेतर्फे तिकिट बुकिंगसह अन्य अनेक सेवा पुरवतात. त्यामुळे रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट (Railway travel Service Agent) माध्यमातून तुम्ही आयआरसीटीसीसोबत जोडले जाऊ शकता. इतकंच नाही तर रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट झाल्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या तिकिटांची बुकिंग करु शकता. त्या मोबदल्यात तुम्हाला कमिशनदेखील मिळेल. (railway-is-giving-business-opportunity-to-the-unemployed-become-an-irctc-agent-ssj93)

शैक्षणिक पात्रता -

रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट होण्यासाठी कोणत्याही विशेष पदवीची किंवा डिप्लोमा करण्याची गरज नाही. केवळ १२ वी पास असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ

उत्पन्न -

रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट झाल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला ठोस मानधन मिळणार नाही. मात्र, तुम्ही जितक्या तिकीटांची बुकिंग कराल तितकं कमिशन तुम्हाला मिळेल. जर दररोज तुम्ही व्यवस्थित काम केलं तर महिन्याला साधारणपणे ४० ते ५० हजार रुपये तुम्ही सहज कमवू शकता.

अर्ज शुल्क -

आयआरसीटीसीच्या या https://www.irctc.com/index.html अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट भरतीची संपूर्ण माहिती मिळेल. तसंच या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. परंतु, प्रथम तुम्हाला ३० हजार रुपये जमा करावे लागतील. हे शुल्क डिमांड ड्राफ्टने आयआरसीटीसीच्या नावाने जमा करावे लागतात. त्यानंतर दरवर्षी नुतनीकरणासाठी तुम्हाला ५ हजार भरावे लागतील. परंतु, ज्यावेळी तुम्ही हे काम बंद कराल त्यावेळी सुरुवातीच्या काळात जमा केलेले ३० हजार रुपये तुम्हाला परत मिळतात.

प्रशिक्षण -

अर्ज करताना ३० हजार रुपये भरल्यानंतर आयआरसीटीसी तर्फे प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर एजंट म्हणून तुमची नियुक्ती केली जाते. यात एक ट्रेनिंग किट दिलं जातं. त्यात रेल्वेची ऑनलाइन तिकीटं कशी बूक करायची, तिकिटांवर कमिशन कसं मिळवायचं हे शिकवलं जातं. तसंच तिकीटे रद्द कशी करायची हेदेखील सांगितलं जातं.

loading image
go to top