esakal | परीक्षा न देताही मिळणार रेल्वेत नोकरी; आठवी पास उमेदवारही करु शकतात अर्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा न देताही मिळणार रेल्वेत नोकरी; आठवी पास उमेदवारही करु शकतात अर्ज 

आठवी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरी करण्याची संधी

परीक्षा न देताही मिळणार रेल्वेत नोकरी; आठवी पास उमेदवारही करु शकतात अर्ज 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण डिजल लोको मॉडर्नायजेशन वर्क्स (Diesel Loco Modernization Works) यांनी अॅपरेंटिस पदांसाठीच्या रिक्त जागेचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. विशेष म्हणजे, आठवी पास उमेदवारही या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. अपरेंटिसच्या एकूण १८२ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवड झाल्यानंतर डिजल लोको मॉडर्नाइजेशन वर्क्समध्ये विविध पदांवर नोकरी दिली जाईल. अर्ज दाखल करण्यासाठी dmw.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर नोकरीबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.  

असा करा अर्ज - 

  • डिजल लोको मॉडर्नाइजेशन वर्क्समधील विविध जागेवर अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.... 
  • सर्वात आधी dmw.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 
  • संकेतस्थलाच्या होम पेज वर डाव्या बाजूला DMW Recruitment 2021 या लिंकवर क्लिक करा...
  • त्यानंतर Apply Online या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर सर्व नोटफिकेशन वाचून नोंदणी करा. 
  •  
  • नोंदणी केल्यानंतर अर्ज करा आणि प्रिंट काढा.  

हेही वाचा :  Saraswat Bank Recruitment 2021: सारस्वत बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित करा अर्ज 

जाहिरातीबाबत संपूर्ण माहिती -
डिजल लोको मॉडर्नाइजेशन वर्क्समध्ये (Diesel Loco Modernization Works) एकूण १८२ पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रीशियन ७० जागा, मॅकेनिक ४०, मशीनिस्ट ३२,  फिटर २३ आणि वेल्डरच्या पदांसाठी १७ जागां आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदरावांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १० मध्ये ५० टक्केंपेक्षा जास्त टक्केवारी असायला हवी. तसेच वेल्डर या पदांसाठी ८ वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. 

अर्जाचं शुल्क -
अर्जसाठी १०० रुपयांचं शुल्क आकारले जाईल. तसेच  एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. 

पगार - 
ज्या उमेदरांची अपरेंटिससाठी निवड करण्यात येईल त्यांना पहिल्या वर्षी प्रतिमहिना ७, ००० रुपयांचं वेतन दिलं जाईल. दुसऱ्या वर्षींपासून प्रतिमहिना सात हजार ७०० तर तिसऱ्या वर्षींपासून प्रतिमहिना ८०५० रुपये इतकं वेतन दिलं जाईल.  

loading image
go to top