No Exam! रेल्वेत आता मुलाखतीशिवाय थेट भरती; GDMO ला मिळणार 95 हजार पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Recruitment 2021

सरकारी नोकरी (Government Jobs) शोधणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झालीय.

No Exam! रेल्वेत मुलाखतीशिवाय थेट भरती; GDMO ला मिळणार 95 हजार पगार

Railway Recruitment 2021 : सरकारी नोकरी (Government Jobs) शोधणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झालीय. पूर्व मध्य रेल्वेनं जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) पदांसाठी थेट भरतीची अधिसूचना जारी केलीय. यासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवार ECR च्या अधिकृत वेबसाइटवर ecr.indianrailways.gov.in या भरतीसंबंधी Notification तपासू शकतात.

वॉक-इन मुलाखत कधी?

पूर्व मध्य रेल्वे 22 नोव्हेंबर 2021 रोजी ऑर्थोपेडिस्ट, फिजिशियन आणि GDMO या पदांच्या भरतीसाठी वॉक-इन (Railway walk-in interview) मुलाखत घेईल. ही मुलाखत सेंट्रल कम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल/ईसीआर/पाटणा येथे होणार आहे. या मुलाखतीच्या तारखेला सकाळी 10.00 वाजेपर्यंत संबंधित कागदपत्रं दिलेल्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे.

रिक्त जागा (Railway vacancy 2021 details)

  • ऑर्थोपेडिस्ट - 2 पद

  • फिजिशियन – 2 पद

  • जीडीएमओ - 2 पद

कोण अर्ज करू शकतो? (Educational qualification)

ऑर्थोपेडिस्ट : एमएस किंवा डीएनबी, डी किंवा ऑर्थो नसल्यास एमएस/जनरल यांना प्राधान्य दिलं जाईल. तसेच GDMO ला 2 वर्षांपेक्षा जास्त शस्त्रक्रियेचा अनुभव असणं आवश्यक आहे. यासाठी MD/मेडिसिन, ICU/ट्रॉमाला प्राधान्य दिलं जाईल.

फिजिशियन : MD/मेडिसिन किंवा DNB/मेडिसिन नसल्यास जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरांना ICU/ट्रॉमामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा.

GDMO : ICU/ ट्रॉमामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या MBBS उमेदवाराला प्राधान्य राहिलं.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचं वय 5 नोव्हेंबर 2021 रोजी 53 वर्षांपेक्षा जास्त नसावं. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.

पगार किती? (Pay Scale)

फिजिशियन - 95000 रुपये प्रति महिना

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर - 75000 रुपये प्रति महिना

याशिवाय रेल्वेमध्ये सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्या उमेदवारांना भत्ते आणि पेन्शनचाही लाभ मिळेल.

loading image
go to top