महत्त्व प्रोसेस डिझाईनचे

औद्योगिक तंत्रज्ञान आणि त्या आधारे उत्पादित झालेले पदार्थ किंवा वस्तू हे घटक आधुनिक अर्थव्यवस्थेत निर्णयात्मक भूमिका बजावतात उत्पादनाची रचना किंवा डिझाईन हे दोन कार्यांवर अवलंबून असते
Rajesh Ohol writes Importance of process design engineering design science
Rajesh Ohol writes Importance of process design engineering design sciencesakal
Summary

पहिले प्रॉडक्ट डिझाईन आणि नंतर प्रोसेस डिझाईन. प्रॉडक्ट डिझाईन कार्यात पदार्थाचे आकारमान ताकद व अन्य बाबी अभियांत्रिकी डिझाईन शास्त्रानुसार ठरविल्या जातात.

- राजेश ओहोळ

औद्योगिक तंत्रज्ञान आणि त्या आधारे उत्पादित झालेले पदार्थ किंवा वस्तू हे घटक आधुनिक अर्थव्यवस्थेत निर्णयात्मक भूमिका बजावतात उत्पादनाची रचना किंवा डिझाईन हे दोन कार्यांवर अवलंबून असते. पहिले प्रॉडक्ट डिझाईन आणि नंतर प्रोसेस डिझाईन. प्रॉडक्ट डिझाईन कार्यात पदार्थाचे आकारमान ताकद व अन्य बाबी अभियांत्रिकी डिझाईन शास्त्रानुसार ठरविल्या जातात. त्याचबरोबर डिझाईन झालेला पदार्थ हा अपेक्षित कार्य सुरळीत व व्यवस्थित करेल का नाही, पदार्थ आकर्षक आहे की नाही आदी सर्व गोष्टी पदार्थ डिझाईनमध्ये कटाक्षाने पाळल्या जातात. यानंतरचा टप्पा येतो तो प्रोसेस डिझाईनचा. यामध्ये डिझाईन केलेला पदार्थ किंवा वस्तू व्यवहार्यदृष्टीने अगदी स्पर्धात्मक खर्चात कशी उत्पादित करता येईल, याचा सर्वांगिण दृष्टीने विचार होतो व त्यानुसार प्रोसेस डिझाईन अंतिम होते.

दिलेल्या वेळेत, कमीतकमी खर्चात व योग्य त्या उत्पादन प्रक्रियांचा व्यवस्थित अवलंब करून उत्पादन प्रक्रियेची रचना म्हणजे प्रोसेस डिझाईन म्हणता येईल. या डिझाईनमध्ये उत्पादन प्रक्रियांच्या क्रमाला फार महत्त्व असते. उत्पादन प्रक्रियांचा क्रम हा उत्पादन कार्यक्षम व प्रभावी आहे की नाही, हे ठरवीत असतो. उत्पादन अर्थकारण हे अतिशय काळजीपूर्वक सांभाळावे लागते. उत्पादन उद्योगांना पदार्थ किंवा वस्तूनिहाय अशा प्रोसेस डिझाईनची आवश्यकता भासते. कमीतकमी खर्च आणि जास्त उत्पादकता, हे तत्त्व उत्पादन उद्योगांना पाळावे लागते.

प्रॉडक्ट डिझाईन आणि प्रोसेस डिझाईन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असे म्हणता येईल. कारण डिझाईन करणारा अभियंता किंवा तंत्रज्ञ याला आपण डिझाईन करतो आहे ती वस्तू उपलब्ध उत्पादन मशिन टुलच्या साहाय्याने उत्पादित होणार आहे की नाही याची प्रथमतः माहिती असावी लागते. त्याचबरोबर अपेक्षित अचूकता आणि उद्योगाची क्षमता आदी बाबी ध्यानात ठेवाव्या लागतात.

अभियांत्रिकी उद्योग, कंपनी, कारखाने यामध्ये प्रोसेस प्लॅनिंग आणि कंट्रोल विभाग प्रोसेस डिझाईनची काळजी घेत असतो. यामध्ये अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल, उत्पादन, औद्योगिक शाखांचे अभियंते यांची आवश्यकता भासते. नवीन डिझाईन झालेल्या वस्तू किंवा पदार्थ यांचे उत्पादन नियोजन हा उत्पादन अभियांत्रिकीचा आत्मा आहे. यासाठी उत्पादन प्रक्रियांची पुरेपूर माहिती असणे गरजेचे असते. अशा क्षेत्रातील नोकरी ही जबाबदारीची असून त्यासाठी उत्पादन प्रक्रियांचे अद्ययावत ज्ञान असावे लागते. या स्वरूपाचा रोजगार सर्व अभियांत्रिकी उत्पादन उद्योगांमध्ये मिळतो.

नवीन वस्तूनिर्मिती किंवा उत्पादन हे क्षेत्र अतिशय विस्तृत व सर्वव्यापी असल्याने यातील संधी व आव्हाने जागतिक स्पर्धेमुळे वाढत आहेत. इंजिनिअरिंग प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व डिझाईनमधील कॉम्प्युटर सॉफ्टवेअर पॅकेजच्या वापराने या क्षेत्रात मोठे क्रांतिकारक बदल झाले. विविध कंपन्यांचे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी असंख्य प्रॉडक्ट बाजारात स्पर्धा करताहेत. औद्योगिक आणि बिगरऔद्योगिक प्रॉडक्ट उत्पादन उद्योगांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. डिझाईन विषयातील प्रशिक्षित व उच्चशिक्षित मनुष्यबळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com