करिअरच्या वाटेवर : रोजगाराभिमुख व्यावसायिक अभ्यासक्रम

प्रत्येकाच्या आयुष्यात करिअर महत्त्वाची भूमिका बजावते. करिअर निवडणे किंवा ठरविणे, हा एक जबाबदारीचा निर्णय आहे. निवडलेले करिअर भविष्याला आकार देते.
Vocational Courses
Vocational CoursesSakal
Summary

प्रत्येकाच्या आयुष्यात करिअर महत्त्वाची भूमिका बजावते. करिअर निवडणे किंवा ठरविणे, हा एक जबाबदारीचा निर्णय आहे. निवडलेले करिअर भविष्याला आकार देते.

- राजेश ओहोळ

प्रत्येकाच्या आयुष्यात करिअर महत्त्वाची भूमिका बजावते. करिअर निवडणे किंवा ठरविणे, हा एक जबाबदारीचा निर्णय आहे. निवडलेले करिअर भविष्याला आकार देते. त्यामुळे करिअर निवडताना विद्यार्थी आणि पालकांनी दूरदृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. सध्या अमुक क्षेत्रात तेजी आहे किंवा माझ्या मित्राने अमुक शाखेत प्रवेश घेतला म्हणून मी क्षेत्र निवडले या आधारे करिअर निवडणे, हा विवेकशून्य निर्णय ठरू शकतो.

नेमके कोणते शिक्षण आपल्या पाल्याला योग्य ठरू शकते हे ठरविणे अवघड आहे. परंतु उपलब्ध शिक्षणाचे विविध अभ्यासक्रमांचे पर्याय व त्यातून मिळणारा भविष्यातील रोजगार त्याचबरोबर सध्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मनुष्यबळाची मागणी, सामाजिक गरज, पाल्याची आवड, जिद्द व बौद्धिक कुवत आदी घटकांचा पुरेपूर विचार केल्यास दहावी किंवा बारावीनंतरचे शिक्षण निवडण्यास निश्चित ठोस दिशा मिळू शकते. दहावी व बारावी नंतरचे शिक्षणाचे कोणते अभ्यासक्रम आहेत, त्यातून मिळणारा रोजगार कोणत्या स्वरूपाचा असू शकतो, विविध स्तरावर अपेक्षित मनुष्यबळ विकासासाठी त्या-त्या शिक्षणाचा उद्देश काय आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

संतुलित सामाजिक विकासास सर्व मनुष्यबळाची आवश्यकता असते. मनुष्य व्यवस्थापनशास्त्रातील हे तत्त्व विचारात घेतल्यास विविध विद्याशाखांतून तयार होणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाकडून अपेक्षित सामाजिक गरजा पूर्ण होतील हा प्रमुख उद्देश अभ्यासक्रम नियोजनात आहे. प्रत्येक प्रकारची विद्या शाखा विशेष प्रकारचा मनुष्यबळ घडवीत असते. त्यामुळे कोणतीही विद्याशाखा टाकाऊ अथवा करिअर घडविणारी नाही, असे नाही. दहावी आणि बारावी शिक्षणातून विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी लागणारी बौद्धिक क्षमता विकसित केली आहे, असे सामान्यपणे अपेक्षित आहे.

पारंपरिक शिक्षण शाखांव्यतिरिक्त नव्या विशेष अभ्यासक्रमांची संख्या वाढलेली आहे. त्याच बरोबरीला अपारंपरिक शिक्षण दूरस्थ शिक्षणाची संकल्पना नोकरी करून पुढे शिक्षण घेणाऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. ठराविक शिक्षणानंतर आपल्या पाल्याला नोकरी किंवा रोजगार उपलब्ध व्हावा, या कारणाने रोजगाराभिमुख शिक्षण सर्वांच्या पसंतीस उतरणे हे स्वाभाविक वाटते. कारण शेवटी ठराविक शिक्षणानंतर रोजगार हा सर्वांनाच अपेक्षित आहे. उच्च शिक्षणाने उमेदवारांची रोजगार पात्रता विस्तृत होते, हा मुद्दा ध्यानात ठेवणे करिअर निवडताना कायम हितावह वाटतो. अल्प मुदतीचे अभ्यासक्रम निवडतानाही पुढील उच्च शिक्षणास अपात्र ठरणार नाही, याची शहानिशा करणे अत्यंत जरुरीचे आहे. उच्च शिक्षण व रोजगार यासाठी निवडलेल्या अभ्यासक्रमाची वैधानिक बाब गांभीर्याने विचाराधीन ठेवावी.

व्यावसायिक अभ्यासक्रम हे रोजगाराभिमुख असल्याने त्या अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्यांचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहेत. यातील कुठल्या प्रकारच्या शाखेत प्रवेश घ्यायचा याबाबतीतही पुरेशी माहिती नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम पहावयास मिळतो. खालील अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून संबोधले जाते.

१) तंत्र शिक्षण

२) वैद्यकीय व दंत शिक्षण

३) औषध निर्माणशास्त्र शिक्षण

४) परिचारिकता शिक्षण

५) कृषी शिक्षण

६) विधी शिक्षण

देशात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये तंत्रशिक्षणाचा वाटा सिंहाचा आहे. औद्योगिक उत्पादकतेत वाढ आणि राहणीमानात बदल घडविण्याचे श्रेय तंत्रशिक्षणाला जाते. तंत्रशिक्षणामध्ये इंजिनिअरिंग, टेक्नोलॉजी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, टाऊन प्लॅनिंग, फार्मसी अप्लाईड आर्ट्स अॅन्ड क्राफ्ट्स हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नोलॉजी आदी अभ्यासक्रमांचा समावेश होतो. तंत्रशिक्षणाच्या या अभ्यासक्रमांवर भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)चा अंमल असतो. शास्त्र-तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याने विशेष तंत्रज्ञांची गरज भासू लागली. परिणामी, मूलभूत शाखांबरोबर नवीन शास्त्र तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम उदयास आले. अशा सामान्येतर अभ्यासक्रमांचाही विचार करिअरसाठी योग्य ठरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com