
कोरोनाच्या महामारीमुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना खूप त्रास होत असला, तरी काही फायदेही होत आहेत. अमेरिकेतील फॉल २१साठी एसएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक विद्यापीठांनी काही ठरावीक विषयांसाठी जीआरईचीमधून सूट देण्याची घोषणा केली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना खूप त्रास होत असला, तरी काही फायदेही होत आहेत. अमेरिकेतील फॉल २१साठी एसएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक विद्यापीठांनी काही ठरावीक विषयांसाठी जीआरईचीमधून सूट देण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे प्रवेशासाठीच्या महत्त्वाचा घटक टाळला गेला आहे. विद्यार्थ्यांकडे जीआरईचा स्कोअर नसतानाही आता नामांकित विद्यापीठांत केवळ शैक्षणिक मार्क व कामाच्या अनुभवाच्या जोरावर प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येईल. अर्थात, टोफेलसाठी अशी कोणतीही सूट दिली गेलेली नाही. ही परीक्षा उत्तीर्ण होणे व त्यात चांगले मार्क मिळवणे शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अनिवार्य आहे
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जीआरईबद्दल अधिक माहिती देताना हेही स्पष्ट करणे गरजेचे आहे, की ही सूट केवळ या वर्षासाठी असून, पुढील वर्षी स्प्रिंग २२ किंवा फॉल २२साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जीआरईची चांगली तयारी करावीच लागणार आहे. इंग्रजी माध्यमातील शाळेत किंवा कॉलजेमधील शिक्षण घेतलेले असल्यास विद्यार्थ्यांची टोफेलसाठीची थोडी फार तयारी होते, मात्र जीआरई ही पूर्णपणे गोष्टी आहे व त्यासाठी तयारी गरजेची आहे. जीआरईची परीक्षा संगणकावर व लेखी अशा दोन्ही स्वरूपात घेतली जाते. मात्र, जेथे संगणकावर परीक्षा देण्याची सोय नाही, अशाच ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
संगणकावर दिली जाणारी परीक्षा ३ तास ४५ मिनिटांची असते व त्यासाठी विद्यार्थ्यांना खूप आधीपासूनच तयारी करावी लागते. प्रश्नपत्रिकेचे तीन भाग असतात - पहिली अॅनालिटिकल रायटिंग टेस्ट, त्यानंतर व्हर्बल रिझनिंग किंवा क्वांटिटिव्ह रिझनिंग टेस्ट असते. विद्यार्थांनी सलग तीन महिने दररोज दोन तास या अभ्यासासाठी दिल्यास त्यांना चांगले मार्क मिळू शकतात. पुढील काही लेखांत मी विद्यार्थ्यांनी परिक्षेची तयारी कशी करावे, हे सांगेन.
Edited By - Prashant Patil