esakal | परदेशात शिकताना... : नोकरी मिळण्याचे तीन मार्ग...
sakal

बोलून बातमी शोधा

Studying Abroad

परदेशात शिकताना... : नोकरी मिळण्याचे तीन मार्ग...

sakal_logo
By
राजीव बोस

अमेरिकेतील विख्यात विद्यापीठामधून उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतरही तेथे तुम्हाला हवी तशी नोकरी मिळवणे हे खूप कष्टाचे काम ठरते. हे काम सोपे होण्यासाठी ही नोकरी मिळवण्याची प्रक्रिया तुम्ही पहिल्या सेमिस्टरपासूनच करायला हवी. त्यासाठी तुमच्या शिक्षकांशी चांगला संपर्क ठेवणे व त्याचबरोबर तुमच्या कोर्स अॅडव्हायजरचा सल्ला घेत राहणे श्रेयस्कर ठरते. ते तुम्हाला नक्की कोठे इंटर्नशिप किंवा असिस्टन्सशिप करावी याचे योग्य मार्गदर्शन करू शकतात व त्याचबरोबर नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात.

विद्यार्थी ३ मार्गांनी नोकरी मिळवू शकतात...

  • कॅम्पस एम्ल्पॉयमेंटच्या माध्यमातून विद्यार्थी पदवी अभ्याक्रमासाठी प्रवेश घेतल्यावर लगेचच नोकरी मिळवू शकतात. यामध्ये साधारणपणे युनिव्हर्सिटी अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसमध्ये, लायब्ररीमध्ये किंवा कॅफेटेरिया, फूड आऊटलेटमध्ये पार्टटाइम नोकरी करण्याची संधी मिळते. यामध्ये आठवड्याचे चार दिवस, प्रत्येकी चार तास नोकरी, असे कामाचे स्वरूप असते.

  • करिक्युलर इंटर्नशिप या दुसऱ्या प्रकारातून विद्यार्थी नोकरी मिळवू शकतात. ही संधी एक वर्षाचे कोर्सवर्क पूर्ण केल्यानंतर मिळते. तुमचा डिसिगनेटेड स्कूल ऑफिशिअल (डीएसओ) तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इलिजिबिलिटी फॉर नॉन-इमिग्रंट स्टुंटट स्टेटस उपलब्ध करून देतो. आवश्यक असलेल्या सर्व फी भरल्यानंतर व इतर सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमचा ‘यूएससीआयएस’ तुम्हाला आवश्यक असलेले एम्प्लॉयमेंट ऑथोरायझेन डाक्युमेंट (ईएडी) देतात व त्या आधारे तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी पात्र ठरता.

  • तुम्ही पदवी मिळवल्यानंतर व तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर नोकरी मिळवण्यासाठी पात्र ठरता, हा तिसरा पर्याय. याचा संबंध ‘एच१बी’ नॉन-इमिग्रंट व्हिसाशी येतो. याद्वारे अमेरिकेतील कंपन्यांना थिअरी आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या कामगारांना नोकरी देण्याची मुभा देण्यात येते. यासाठी कंपन्यांना पिटिशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि विशिष्ट कालावधीत या उमेदवारांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा लागतो. यामधील महत्त्वाचा भाग लॉटरी व्यवस्था हा असतो व त्यामध्ये ६५ हजार अर्जांना ‘एच१बी’ प्रकारामध्ये व्हिसा देण्याची मर्यादा लादलेली असते.