आयुष्यातील ओव्हरटेकिंग

रमेश सूद
Thursday, 16 January 2020

मी एकेदिवशी पुण्यातील वाहतुकीने गजबजलेल्या खराडी बायपासवरून माझी मारुती-८०० चालवत होतो. अचानक एक मोठी कार चुकीच्या दिशेने, धोकादायक पद्धतीने मला ओव्हरटेक करत असल्याचे लक्षात आले. त्या कारचा चालक एखाद्या शर्यतीप्रमाणे कार चालवत होता. तरीही मी माझी कार नेहमीच्या हळुवार गतीनेच चालवली.

मी एकेदिवशी पुण्यातील वाहतुकीने गजबजलेल्या खराडी बायपासवरून माझी मारुती-८०० चालवत होतो. अचानक एक मोठी कार चुकीच्या दिशेने, धोकादायक पद्धतीने मला ओव्हरटेक करत असल्याचे लक्षात आले. त्या कारचा चालक एखाद्या शर्यतीप्रमाणे कार चालवत होता. तरीही मी माझी कार नेहमीच्या हळुवार गतीनेच चालवली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी पुढील एका सिग्नलवर पोचलो. तेथून मला डावीकडे वळायचे होते. या सिग्नलवर डावीकडे वळणारी थोडीच वाहने होती. त्यामुळे मला पुढे सरकण्यासाठी जागा होती. मी माझी कार पुढे घेत असतानाच थोड्या वेळापूर्वी ओव्हरटेक करणाऱ्या कारच्या बाजूला आलो. मी त्या कारचालकाकडे पाहत स्मितहास्य केले. त्यानेही माझ्याकडे पाहिले. मात्र मान वळवली आणि माझ्याप्रमाणे स्मितहास्य करण्याचे टाळले. एवढ्यात सिग्नल हिरवा झाला. माझे स्मितहास्य त्याने परत करण्याऐवजी स्वतःकडेच ठेवले! तो सरळ निघून गेला. मी डावीकडे वळालो. खरेतर, मी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केल्यावर त्याने उलट स्मितहास्य केले नाही, तो माझे स्मितहास्य स्वतःसोबतच घेऊन गेला याचे मला काहीच वाटले नाही. कारण, माझ्या हृदयात लगेचच दुसरे स्मितहास्य तयार होईल, हे मला चांगलेच ठाऊक होते. निसर्ग आणि लोकच माझ्या हृदयात स्मितहास्याची बीजे पेरून ठेवतात. खरेतर, या अनुभवाने मला विचार करायला भाग पाडले. आयुष्यात या कारप्रमाणेच चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करून काहीजण आपल्याला मागे टाकतात. पुढे नंतर कधीतरी ते भेटतात... कुठेतरी, कधीतरी, गूढ, स्पष्ट न करता येण्याजोग्या परिस्थितीत. एकमेकांच्या समोर आल्याने सर्वकाळ ॲक्सिलेटर दाबून कारप्रमाणे आयुष्य पुढे नेण्यातील निरर्थकताच या वेळी दिसते. अखेरीस आयुष्यात आरामदायक पद्धतीने पुढे जाता यायला हवे.

तुम्हाला काय वाटते? तुम्ही कसे जाताय आयुष्यात पुढे?

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sood article about life