मूल्यांचा रस्ता शोधताना...

रमेश सूद
Thursday, 23 January 2020

आपण आयुष्यात काही मूल्ये पाळतो. या मूल्यांशी तडजोड करायलाही आपल्याला नको वाटते. मात्र, आयुष्यात या मूल्यांशी ठाम राहताना आपली खऱ्या अर्थाने परीक्षा होते.

 इम्प्रूव्ह युअर सेल्फ
आपण आयुष्यात काही मूल्ये पाळतो. या मूल्यांशी तडजोड करायलाही आपल्याला नको वाटते. मात्र, आयुष्यात या मूल्यांशी ठाम राहताना आपली खऱ्या अर्थाने परीक्षा होते. मनामध्ये एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो. माझ्या मित्राबाबत नेमके हेच घडले. एकदा त्याने त्याच्या वडिलांना विचारले, ‘‘डॅड, मला माझ्या बॉसने माझ्या मूल्यांमध्ये न बसणारे काम सांगितले. अशावेळी मी काय करायला हवे?’’ वडील त्याला म्हणाले, ‘‘तू जास्त काही करू नको. फक्त घरी ये आणि तुझा राजीनामा पाठवून दे. आपण पुढे काय करायचे ते पाहू.’’ त्याने राजीनामा पाठवला. दुसऱ्या शहरातून स्वतःच्या गावी परतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साधारण दोन महिने गेले. हा मित्र आणि त्याचे वडीलही नोकरी गमावल्याबद्दल स्वत:ला जबाबदार समजत होते. दोघेही मला भेटले. चर्चेदरम्यान त्याचे वडील मला म्हणाले, ‘‘माझ्या मुलाची या सर्व प्रकरणामुळे कोंडी झालीय. त्याला तुम्हाला भेटून स्वत:ला प्रेरित करायचे आहे.’’ मी त्यानुसार या तरुणाला भेटलो.

त्याला म्हणालो, ‘‘तुला नेमके काय वाटतेय, ते मला सांगतो का?’’ तो म्हणाला, ‘‘सर, मी गेले दोन महिने घरातच आहे. नव्या नोकरीचा शोधही घेत नाहीये. आधीची नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य होता का, हा प्रश्न छळतोय. माझी कोंडी झाल्यासारखे वाटतेय.’’ मी त्याच्या बोलण्यावर विचार केला. त्याला सहानुभूती दाखविली. माझ्या स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहिले. या वेळी शिकलेला एक धडा आठवला. तो त्याला सांगत मी म्हणालो, ‘‘आयुष्यात कधीतरी मूल्ये जपताना आयुष्यच ठप्प झाल्यासारखे वाटते. आपली पुरती कोंडी होते. आपण मागे पडतोय असे वाटते, पण खरेतर आपण या वेळी मोठ्या शक्तीने पुढे सरकत असतो. त्यामुळे संयम, श्रद्धा ठेव. लवकरच नवा रस्ता सापडेल.’’ त्याला लवकरच नवीन नोकरी मिळाली. तुमच्या आयुष्यातही मूल्यांवरून असा संघर्ष होतोय का, वाट पाहा. तुम्हालाही रस्ता दिसेल.

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sood article about life