इम्प्रूव्ह युअरसेल्फ : स्वप्ने आणि जबाबदाऱ्या 

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर 
Thursday, 23 April 2020

केवळ पैसा मिळविणे हे एकच माझे स्वप्न कधीच नव्हते. माझ्यासाठी एखाद्या प्रतिची जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करणे हेच पहिले स्वप्न होते. तुम्ही तुमची स्वप्न जगा, तुम्हालाही सांगितले जाईल. ते चांगलेच आहे.

‘तू तुझी स्वप्ने जग,’ असे मला सांगण्यात आले होते. स्वप्ने, कसली स्वप्ने? माझ्या कुटुंबाला कोठूनही, कसलीही मदत नव्हती. मला अशा कुटुंबाची काळजी घ्यायची होती. मी महिना ५०० रुपये पगाराच्या नोकरीपासून सुरवात केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या मुलांनी चांगले आयुष्य जगावे, हे माझे स्वप्न होते आणि माझ्या वडिलांनीही हेच स्वप्न पाहिले होते. दिवस जात राहिले, तशी स्वप्ने बदलत राहिली. 

अखेरीस मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोचलो होतो, जिथे आयुष्याचा प्रवाह एखाद्या स्वप्नासारखाच वाटत होता. त्यानंतर माझ्या गरजा अशा अतिरिक्त गोष्टी पूर्ण करत गेल्या, ज्यांनी माझ्या आयुष्याचा दर्जा वाढवला. त्यात गरजांपेक्षा अधिक काही नव्हते, तर त्यात एक प्रकारचा आरामशीरपणा होता. माझे लक्ष्य गरजांवर केंद्रित होते. 

केवळ पैसा मिळविणे हे एकच माझे स्वप्न कधीच नव्हते. माझ्यासाठी एखाद्या प्रतिची जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करणे हेच पहिले स्वप्न होते. तुम्ही तुमची स्वप्न जगा, तुम्हालाही सांगितले जाईल. ते चांगलेच आहे. 

तुम्ही येथे फक्त एक खबरदारी घ्यायला हवी. इतर कुणीही त्यांची स्वप्ने देऊ नयेत किंवा विकूही नयेत. ते स्वप्न केवळ तुमचे असायला हवे. फक्त तुमचे स्वप्न. पूर्णपणे तुमचे. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असला, तरी तुम्ही मानत असलेल्या किंवा छातीशी घट्टपणे कवटाळणाऱ्या मूल्यांना तुमच्या स्वप्नाला आकार देऊ द्या. एकदा तुम्ही हे ठरविले की, त्यानंतर जीव ओतून, मनापासून तुमच्या स्वप्नाचा पाठपुरावा करा. त्यामध्ये तुमचे हदय ओता. मी माझ्या आयुष्यात माझ्या जबाबदारीला पहिले प्राधान्य दिले. बाकीचे स्वप्ने थोडी पुढे ढकलून दिली. आता तुम्हीच ठरवायचे. मी फक्त माझे विचार तुमच्यापुढे ठेवले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh sood article Dreams and Responsibilities

Tags
टॉपिकस
Topic Tags: