इम्प्रूव्ह युअरसेल्फ : स्वसंवादाची कला 

रमेश सूद
Thursday, 14 May 2020

मी माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार किंवा भावनांना अधिक वेळ रेंगाळूही देत नाही.ते माझ्या हृदयाची गती सामान्य ठेवतात.मी माझ्या शरीराशीही दयाळूपणाने वागतो. मी नियमितपणे सकाळी चालायला जातो.

‘‘तुम्ही स्वत:चे वर्णन कसे कराल,’’ मी एका कार्यशाळेत उपस्थितांना विचारले. 

‘‘मी एक दयाळू व्यक्ती आहे. मी इतरांबद्दल तसेच स्वत:बद्दलही दयाळू आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत मी माझा मेंदू सक्षम, समृद्ध करत राहतो. मी रागावत नाही असं नाही, पण मी लवकरच म्हणजे क्षणातच परत नॉर्मल होतो किंवा निराशही होत नाही. मी माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार किंवा भावनांना अधिक वेळ रेंगाळूही देत नाही. ते माझ्या हृदयाची गती सामान्य ठेवतात. त्याचप्रमाणे, मी माझ्या शरीराशीही दयाळूपणाने वागतो. मी नियमितपणे सकाळी चालायला जातो. सध्याच्या दिवसांत माझ्या रूममध्येच दररोज एक तास चालतो आणि मला आरोग्याच्या इतर कोणत्या वाईट सवयीही नाहीत. मी प्रार्थना आणि ध्यानाच्या माध्यमातून माझ्या चैतन्याच्याही नियमित संपर्कात असतो. बहुतेकवेळा त्याचे ऐकतोही. सामान्यत: मी लोकांशी छान वागतो आणि तेही माझ्याशी तसेच वागतात. मी स्वत:चे वर्णन व्यस्थित केलेय, अशी मला आशा आहे.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘ओह, होय,’’ मी यासंदर्भात आणखी काय विचारू शकतो, याचे मला आश्चर्य वाटले. 

‘‘धन्यवाद, तुम्हाला मी विश्वासार्ह वाटलो, याचा मला आनंद झाला. खरेतर इतराना मी विश्वासार्ह वाटतो की नाही, हा मुद्दाच नाही. तो तर तू आणि मी यांच्यातील विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी माझी मान हलवली आणि स्वसंवादातून बाहेर आलो. होय, मी कधीकधी अशा प्रकारे स्वत:शीच संवाद साधतो, मी योग्य मार्गावर आहे का हे तपासण्यासाठी. त्याचप्रमाणे, मी इतरांना शिकवतोय, ते स्वत: अमलात आणतोय, का हेही तपासतो. तुम्हाला यासाठी प्रामाणिक स्वसंवादापेक्षा दुसऱ्या कशाचीच अधिक मदत होऊ शकत नाही. आता मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, एखाद्याचा स्वसंवाद चुकीचाही असू शकतो का, आपली जगण्याची पद्धत आणि अंतिमत: आयुष्याचा एकूणच दर्जा सुधारण्याचा स्वसंवाद हा सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. तुम्ही स्वसंवाद साधता का, सध्याचा लॉकडाउनचा काळ त्यासाठी चांगला आहे.

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sood writes about art of self-communication improve yourself

Tags
टॉपिकस
Topic Tags: