वादविवाद करताना... 

वादविवाद करताना... 

‘‘सर,मी आज खूप आनंदी आहे,’’ एकजण मला म्हणाला. 

‘‘का?’’ मी त्याला आनंदाचे कारण विचारले. 

‘‘सर, मी एक वादविवाद जिंकलो. या कडाक्याच्या वादविवादास एक तास लागला. पण अखेरीस मी तो जिंकलाच,’’ त्याने उत्तर दिले. 

‘‘हा वादविवाद नेमका कशाबद्दल होता?’’ मी विचारले. 

‘‘तो क्रिकेटच्या प्रशासनाबद्दल होता,’’ त्याने मला सांगितले. 

‘‘तुला त्याबद्दल कितपत काळजी वाटत होती?’’ मी पुन्हा प्रश्न केला. 

‘‘सर, मला काळजी तर आहेच. माझे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. त्यामुळे वादविवादात मी माझा मुद्दा सिद्ध करून दाखवला,’’त्याने स्पष्टीकरण दिले. 

‘‘त्यामुळे सर्व काही बदलले का? आपल्या परिचयाच्या व्यक्तीबरोबर एवढा वेळ घालून वादविवादात जिंकून अखेरीस काय मिळवलेस?’’ मी पुन्हा एकदा त्याला विचारले. 

‘‘नाही, काहीच मिळाले नाही. पण मला खूप चांगले वाटले. माझ्यासाठी हे छोटे यशच आहे,’’ तो आपली बाजू मांडत होता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी त्याचे अभिनंदन केले नाही. कारण त्याच्या आयुष्यात अशा प्रकारच्या वादविवादामुळे मूल्यात्मक भर पडणार नव्हती. 

या प्रसंगाच्या निमित्ताने आज मी पुन्हा जेव्हा माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा मला काळाच्या कागदावर असे अनेक लाल ठिपके दिसतात. ते म्हणजे लोकांबरोबर फक्त माझ्या अहंकाराच्या समाधानासाठी केलेले निरर्थक वादविवाद. अहंकाराचे असले समाधान आणि निरर्थक यशातून आनंद मिळवण्याचे व्यसन लागू शकते. त्यामुळे अशा वादविवादातील यश निरर्थक ठरते. त्यामुळे जाणीवपूर्वक असे वाद टाळणेच श्रेयस्कर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com