शोध चांगल्या गोष्टींचा... 

रमेश सूद, कोच, ट्रेनर,स्टोरी टेलर 
Thursday, 24 September 2020

आपण बदलू शकतो. तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा मी त्यातील चांगले शोधावे. त्याचप्रमाणे, मी एखादी गोष्ट करतो, त्यावेळी तुम्ही त्यातील काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्वजण ही नवीन सवय लावून घेऊया. 

मी काहीतरी करतो, तू टीका करतोस. 
तू काहीतरी करतो, मी टीका करतो. 
आणि मग एक दिवस असा येतो की त्या दिवशी आपण दोघेही काहीही करण्यास सक्षम नसतो. त्या दिवशी आपण दोघेही एकत्र येऊन इतरांवर टीका करतो. खरे तर अशा प्रकारे दुःखी राहण्याची सवयच आपल्याला लागते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

‘तू ही डिश येथे का ठेवली?’ 
‘तू तुझे हात धुतले का?’ 
‘मला या भाजीची चव अजिबात आवडत नाही. तुम्ही लोक ती कशी खाता काय ठाऊक?’ 
‘तू हे असले कोणत्या प्रकारचे कपडे घातले आहेस?’ 
‘हे देवा, लाईटला पण आत्ताच जायचे होते?’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा प्रकारचे संवाद घरोघरी ऐकायला मिळतात. तू आनंदी आहेस. मी नाही आणि मी तुलाही आनंदी होऊ देणार नाही, अशा प्रकारची वृत्ती असते. 

चला, आपण आपल्या स्वतःचेच निरीक्षण करूया. आपणही या सवयीमुळे त्रस्त आहोत का, हे शोधून काढूया. आपण बदलू शकतो. तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा मी त्यातील चांगले शोधावे. त्याचप्रमाणे, मी एखादी गोष्ट करतो, त्यावेळी तुम्ही त्यातील काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्वजण ही नवीन सवय लावून घेऊया. 

मला तुमच्यामध्ये एक चांगली गोष्ट सापडली. ती म्हणजे तुमचे मन विचारी आहे. अन्यथा, तुम्ही माझे हे सदर वाचले नसते. होय ना? एकमेकांमधील चांगल्या गोष्टी शोधण्यासाठी शुभेच्छा... 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh sud Article about Search for good things

Tags
टॉपिकस
Topic Tags: