पुस्तकांच्या मार्गावर चालताना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तकांच्या मार्गावर चालताना...

आयुष्यात शिकलेले हे धडे पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी मी कधीकधी एकेक पुस्तक चाळतो. आज अचानक एक खास पुस्तक माझ्या हातात आले. हे पुस्तक मला कसे मिळाले, त्याचीही एक कहाणी आहे. 

पुस्तकांच्या मार्गावर चालताना...

sakal_logo
By
रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर

मी गेल्या काही वर्षांत पुस्तकांचा संग्रह केला आहे. पहिल्यांदा वाचल्यावर मला या पुस्तकांनी मोठे धडे दिले. आयुष्यात शिकलेले हे धडे पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी मी कधीकधी एकेक पुस्तक चाळतो. आज अचानक एक खास पुस्तक माझ्या हातात आले. हे पुस्तक मला कसे मिळाले, त्याचीही एक कहाणी आहे. 

तो काहीसा कठीण काळ होता. मी नुकतीच माझी नोकरी सोडली होती. अशा परिस्थितीत वयही माझ्या बाजूने नव्हते. त्यामुळे मी संघर्ष करत होतो. एकेदिवशी मी माझ्या सर्वोत्तम मित्र, म्हणजे पुस्तकांबरोबर वेळ घालविण्याचे ठरविले. त्यासाठी मी माझ्या घराजवळील पुस्तकाच्या एका मोठ्या दुकानात गेलो. मी दुकानात प्रवेश करताच मला दिसले, की खोक्यांतून नवीन पुस्तके काढून एकावर एक रचली जात आहेत. अशातच अनवधानाने माझ्या हाताच्या कोपराचा धक्का या रचलेल्या पुस्तकांच्या ढिगाला लागला. त्यातील फक्त एकच पुस्तक निसटून खाली पडले. मी ते घेण्यासाठी खाली वाकलो आणि पुस्तकाच्या मलपृष्ठावरील एका वाक्याने माझे लक्ष वेधून घेतले. मी ते वाचले...

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. तुमचा आतला आवाज ऐका आणि ‘डॅनियल डॉल्फिन’ला तुम्हा सर्वांना तुमच्या सर्वाधिक जादुई सफरीवर घेऊन जाऊ द्या. ही सफर म्हणजे तुमच्या स्वतःच्या नशिबाची तहान भागविण्याचे अनोखे धाडस.’

ते वाचून मी आश्चर्यचकित झालो. त्याच क्षणी ते पुस्तक विकत घेतले. जणूकाही देवाने हे पुस्तक माझ्या मदतीसाठी आयुष्यात अशा टप्प्यावर दिले होते, जेव्हा माझ्याकडे करण्यासारखे काहीच नव्हते. मला फक्त माझा मार्ग चालायचा होता.

मी पुस्तकाचे आणखी एक पान उघडले. त्यात खालील परिच्छेद होता...

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असे काहीतरी असते. तुम्हाला ते तुमच्या हृदयानेच पाहावे लागते. ही कठीण गोष्ट आहे. उदा. ः तुमच्यातील तरुणाने आपल्या चैतन्याशी गाठ घालून तुमची स्मरणशक्ती, अनुभव आणि त्याची स्वप्ने यांच्या आधारे पुढे चालत धाडसाने मार्ग काढणे म्हणजेच आयुष्य होय. तुम्ही सदैव ते सर्वोत्तम बनविण्याचा प्रयत्न करा. तसे केल्यास तुमचे हृदय कधीही थकणार नाही किंवा वृद्धही होणार नाही.’

मी ‘डॉल्फिन’ नावाचे हे पुस्तक घरी आणले. त्यानंतर लवकरच पुन्हा माझ्या मार्गावर चालू लागलो. 

तुम्हीही तुमच्या मार्गावर चालता ना?

loading image
go to top