आयुष्याचे 'गणित' सोडवताना

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 17 September 2020

नातेसंबंधही गणितासारखेच असतात. सर्वकाही केल्यावरही प्रश्‍न सुटत नसेल तर तो सोडून द्या. पुढील पर्यायाकडे वळा. तुम्ही स्वीकार करा. असे असेल तर ठीक आहे, हे स्वीकारा.

‘ती   व्यक्ती समजून घ्यायला खूपच अवघड आहे. एक प्रकारचा खराखुरा प्रश्‍नच आहे. या व्यक्तीला नेमके हाताळावे तरी कसे, याचाच विचार मी करत असतो.’ एकजण म्हणाला.

‘कोण आहे तो?’ मी विचारले.
‘माझा सहकारी आहे,’ तो मला म्हणाला.

‘तो तुझा प्रश्‍न आहे?’ मी त्याला पुन्हा एकदा विचारले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘हो, माझा हा सहकारी म्हणजे खूप अवघड प्रश्‍न आहे,’ त्याने पुन्हा एकदा ठामपणे उत्तर दिले.

‘मी समजू शकतो,’ त्याला दिलासा देत मी म्हणालो. ‘तुला गणित आवडते का?’ आता मी प्रश्‍न विचारला.

‘हो. मी शाळेत गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळवायचो,’ तो म्हणाला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘छान, मग त्याचा गणितातील प्रश्‍न समजून विचार कर. जीवनाच्या परीक्षेत तो सक्तीचा प्रश्‍न असेल तरच सोडव,’ मी त्याला सांगितले.

माझ्या बोलण्यावर तो विचार करून म्हणाला,

‘नाही, तो काही माझ्या आयुष्यातील सक्तीचा प्रश्‍न नाही.’

‘तसे असेल तर सोडून दे. तुझा मेंदू अशा विचारांनी का थकवतोस?’ मी म्हणालो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणि हा प्रश्‍न सुटला. आपल्या आयुष्यातही असेच असते. आपण मुळात एखादा प्रश्‍न, समस्या अस्तित्वात नाही, हे नीट समजून घेतो तेव्हा आपल्या आयुष्यातील ९० टक्के प्रश्‍न सुटतात. गणितातील प्रश्‍नांसारखा विचार करा. तो गणितातील प्रश्‍नांसारखा अनिवार्य असेल, तर त्याचे काही भागात तुकडे करा. त्यामुळे प्रश्‍न सोपा होण्यास मदत होईल. नातेसंबंधही गणितासारखेच असतात. सर्वकाही केल्यावरही प्रश्‍न सुटत नसेल तर तो सोडून द्या. पुढील पर्यायाकडे वळा. तुम्ही स्वीकार करा. असे असेल तर ठीक आहे, हे स्वीकारा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Sud writes article about Relationships

Tags
टॉपिकस
Topic Tags: