CS Exam : परीक्षेवेळी तब्येत बिघडली, पण जिद्द सोडली नाही! CS परीक्षेत इचलकरंजीची राशी पारख देशात प्रथम

वयाच्या १९ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात राशी हिने सीएस परीक्षेत मिळविलेल्या यशाचा खूप अभिमान वाटत आहे.
Rashi Parakh CS exam
Rashi Parakh CS examesakal
Summary

परीक्षेच्यादरम्यान मानसिक तणाव आल्याने तब्येत बिघडली. पण, या परीक्षेत यश मिळविण्याची जिद्द सोडली नाही.

कोल्हापूर : दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (ICSI) जून २०२३ मध्ये घेतलेल्या सीएस (Company Secretary) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. त्यातील व्यावसायिक (प्रोफेशनल प्रोग्राम) परीक्षेत इचलकरंजी येथील राशी अमृत पारख (Rashi Parakh) हिने ९०० पैकी ५५३ गुणांची कमाई करत देशात प्रथम क्रमांक पटकाविला.

तिने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात असणाऱ्या राशी हिचे वडील अमृत सीएस आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तिने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. ॲकॅडमीतील शिक्षकांचे मार्गदर्शन, सेल्फ स्टडीवर भर देत तिने या परीक्षेची तयारी केली.

Rashi Parakh CS exam
D.Ed Course : 'डी. एड्.'ला उतरती कळा! अनुदानित विद्यालयांमध्ये अवघे 45 विद्यार्थी, 'इतक्या' संस्था झाल्या बंद

ती परीक्षेआधी दोन महिने दिवसाकाठी ७ ते १० तास अभ्यास करत होती. या तयारीच्या जोरावर तिने देशात अव्वलस्थान पटकाविले आहे. तिचे शालेय शिक्षण इचलकरंजीतील न्यू मिलिनिअम पब्लिक स्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण श्रद्धा ज्युनिअर कॉलेजमधून झाले. व्यंकटेश महाविद्यालयातून ती पदवीचे शिक्षण घेत आहे. तिच्या आई सीमा या गृहिणी, तर बहीण तन्वी आणि भाऊ जिनय शिक्षण घेत आहेत.

कोल्हापूरच्या ३० विद्यार्थ्यांचे यश

कोल्हापूर जिल्ह्यातून सीएस परीक्षेत एकूण ३० विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यात व्यावसायिक परीक्षेतील ७ आणि कार्यात्मक (एक्झिक्युटिव्ह) परीक्षेतील २३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना ‘आयसीएसआय’ कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्ष कपिला टिक्के, उपाध्यक्ष सचिन बिडकर, सचिव जयदीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

Rashi Parakh CS exam
Solapur Politics : 83 वर्षाच्या योद्ध्याची नेत्यांना धास्ती; पवारांच्या 'या' खेळीचा अंदाज कोणालाच लागत नाही, दिग्गजांना चिंता

वयाच्या १९ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात राशी हिने सीएस परीक्षेत मिळविलेल्या यशाचा खूप अभिमान वाटत आहे. जे ठरविले त्यात तिने यश मिळविले, याचा मोठा आनंद आहे. तिला आयसीएसआय कोल्हापूर चॅप्टर तसेच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

-अमृत पारख

ऐन परीक्षेवेळी तब्येत बिघडली

परीक्षेच्यादरम्यान मानसिक तणाव आल्याने तब्येत बिघडली. पण, या परीक्षेत यश मिळविण्याची जिद्द सोडली नाही. तिने कुटुंबीयांच्या पाठबळावर परीक्षा दिली. याचा खूप आनंद होत आहे, अशी भावना राशी हिने दिली. माझ्या यशात कुटुंबीय, शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. सीएस म्हणून काम करताना कायदा अभ्यासदेखील असावा लागतो. त्यामुळे आता मी तीन वर्षांच्या ‘लॉ’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असल्याचे तिने सांगितले.

Rashi Parakh CS exam
Sharad Ponkshe : राजमाता जिजाऊंनी शिवरायांना श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी शिकवल्या; मराठी अभिनेत्याचं वक्तव्य

यशाचे गमक

  • दररोज सात तास अभ्यास

  • स्वतः नोटस् काढल्या

  • स्वयं अध्ययनावर भर

  • ऑनलाईन वर्गातूनही मार्गदर्शन

  • उत्तरोत्तर सराव वाढविला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com