esakal | 10वी पास उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

बोलून बातमी शोधा

rbi office attendant vacancy 2021 bank jobs for 10th pass Marathi article }

कोरोना महामारीचा फटका सर्वांनाच बसला आहे, खाजगी  क्षेत्रात बऱ्याच जणांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. दरम्यान 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सध्या सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

10वी पास उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
sakal_logo
By
टीम ईसकाळ

कोरोना महामारीचा फटका सर्वांनाच बसला आहे, खाजगी  क्षेत्रात बऱ्याच जणांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. दरम्यान 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सध्या सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

जर आपण दहावी उत्तीर्ण केली असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शेकडो ऑफिस अटेंडंट (Office Attedent) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये  Vacancy 2021 अंतर्गत  देशभरात पदांची भरती केली जाणार आहे. तुम्ही राहात असलेल्य प्रदेशानुसार अर्ज करून आरबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवू शकता. या आरबीआयच्या रिक्त जागांसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे.

पदाचे नाव - ऑफिस अटेंडंट (Office Attedent)
पदांची संख्या (प्रदेशानुसार)

कानपूर - 69 पदे

अहमदाबाद - 50 पदे

बंगळुरु - 28 पदे

भोपाळ - 24

भुवनेश्वर - 24

चंदीगड - 31 

चेन्नई - 71

गुवाहाटी - 38

हैदराबाद - 57

जम्मू - 09

जयपूर - 43

कोलकाता - 35

मुंबई - 202

नागपूर - 55

नवी दिल्ली - 50

पाटणा - 28

तिरुवनंतपुरम - 26
 

एकूण पदांची संख्या- 841

वेतनश्रेणी - 10,940 ते दरमहा 23,700 रुपये दरमहा (अतिरिक्त पगारासह इतर भत्ते वेतन दिले जाईल)

पात्रता - मान्यता प्राप्त बोर्डमधून दहावी उत्तीर्ण, वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अर्ज फी  - जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी 450 रुपये. एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी कर्मचार्‍यांना 50 रुपये. अर्ज आरबीआय वेबसाइट rbi.org.in वर भरावा लागेल. 

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू - 24 फेब्रुवारी 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15 मार्च 2021
परीक्षेची तारीख - 9 आणि 10 एप्रिल 2021

निवड - उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षा व भाषा प्राविण्य परीक्षेच्या आधारे होईल. . तपशील सूचना पहा.