esakal | 'ऑइल इंडिया'त 119 पदांसाठी भरती; 'या' दिवसांपासून होणार थेट Interview
sakal

बोलून बातमी शोधा

Oil India Limited

'ऑइल इंडिया'त 119 पदांसाठी भरती; 'या' दिवसांपासून होणार थेट Interview

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : OIL Recruitment 2021 : भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑयल इंडिया लिमिटेडने (ओआयएल) कंत्राटी पद्धतीने दुलियाजान (आसाम) येथील मुख्यालयात 119 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केलीय. कंपनीने बुधवारी 5 मे रोजी जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार (क्र. HRAQ/CONT-WP-B/21-473) सहाय्यक मेकॅनिक, गॅस लॉगर, ड्रिलिंग टॉपमन, सहाय्यक रिग इलेक्ट्रिशियन, केमिकल सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक, ड्रिलिंग रिगमन आणि ड्रिलिंग हेडमेनच्या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. (Recruitment For 119 Posts In Oil India Limited)

आपणही करू शकता अर्ज

इच्छुक उमेदवार ओआयएलच्या अधिकृत वेबसाइटवरुन oil-india.com अधिसूचना डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना थेट मुख्यालयात घेण्यात येणाऱ्या वॉक-इन-प्रॅक्टिकल / कौशल्य टेस्ट-पर्सनल मूल्यांकनात भाग घ्यावा लागेल. वॉक-इन-प्रॅक्टिकल / स्किल टेस्ट मूल्यांकन 24 मेपासून सुरू होणार असून उमेदवार 22 जून 2021 पर्यंत पदांनुसार ठरलेल्या तारखांना येऊ शकतात.

अशी होईल निवड

ऑइल इंडिया लिमिटेड (ओआयएल) मधील सहाय्यक मेकॅनिक आणि इतर पदांसाठी उमेदवारांची निवड वॉक-इन-प्रॅक्टिकल / कौशल्य चाचणी या मूल्यांकनाच्या आधारे केली जाईल. ही चाचणी 24 मे ते 22 जूनपर्यंत घेण्यात येणार आहे. दरम्यान, उमेदवारांना दिलेल्या तारखेनुसार, सकाळी 7 ते 11 यावेळेत केंद्रात हजर रहावे लागणार आहे.

कोण अर्ज करू शकेल?

ओआयएल सहाय्यक मेकॅनिक आणि अन्य भरतीच्या अधिसूचनेनुसार, सहाय्यक मेकॅनिक पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असावी, शिवाय एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित व्यापारातील ट्रेड सर्टिफिकेट असावे. या पदांची वयोमर्यादा नोंदणीच्या तारखेस 18 वर्षे ते 35 वर्षांपर्यंत निश्चित केली आहे. राखीव वर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याची तरतूद आहे.

रेल्वे रूग्णालयात नोकरीची सुवर्ण संधी; ऑनलाईन मुलाखतीव्दारे होणार 'मेडिकल स्टाफ'ची निवड

Recruitment For 119 Posts In Oil India Limited