esakal | क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या 320 जागांसाठी बंपर भरती; 'असा' भरा अर्ज

बोलून बातमी शोधा

Sports Authority of India
क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या 320 जागांसाठी बंपर भरती; 'असा' भरा अर्ज
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : SAI Coach Recruitment 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरणने (Sports Authority of India, SAI) प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करुन अर्ज मागविले आहेत. अधिकृत संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया आज 20 एप्रिल 2021 पासून सुरू केली जाणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे आहे. इच्छुकांनी sportsauthorityofindia.nic.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

प्रशिक्षकांची 100, तर सहाय्यक प्रशिक्षकांची 220 रिक्त पदे या भरतीतून भरली जाणार आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती तपासावी. वेबसाइटवर प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांच्या रिक्त जागांसाठी दोन भिन्न सूचनाही असणार आहेत.

SBI Recruitment 2021 : संपूर्ण देशभरात SBI ची बंपर भरती; नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

पात्रतेचे असे असतील निकष..

प्रशिक्षक पदासाठी उमेदवारांकडून SAI, NS NIS किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय / परदेशी विद्यापीठाकडून प्रशिक्षण पदविका किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता अथवा दोनदा ऑलिम्पिकचा सहभाग, तसेच ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय भागीदारी असणे आवश्यक आहे. द्रोणाचार्य पुरस्कार असणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर SAI, NS NIS किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय / विदेशी विद्यापीठातून पदवी असावी. या शिवाय ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असलेले उमेदवार सहाय्यक कोच पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या व्यतिरिक्त कोचसाठी उमेदवारांचे कमाल वय 45 वर्षे आणि सहाय्यक कोचसाठी 40 वर्षे निश्चित केले गेले आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वय मोजले जाईल, याचीही नोंद आवश्यक आहे.

असा भरा ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना sportsauthorityofindia.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. यानंतर, आपल्याला मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या Job Opportunities या ऑप्शनवरती क्लिक करावे लागेल. तद्नंतर तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.