esakal | कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना सुवर्ण संधी; साताऱ्यात तब्बल 393 जागांसाठी भरती
sakal

बोलून बातमी शोधा

Recruitment

कोरोना महामारीत सर्व काही बंद राहिल्याने अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. संसर्ग झाल्यामुळे अनेकांनी ‘गड्या आपला गाव बरा’ असे म्हणत गाव गाठले.

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना सुवर्ण संधी

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी केलेल्या लाकडाउनमुळे (Lockdown) तब्बल दीड ते दोन हजार लोकांना नोकऱ्या (Jobs) गमवाव्या लागल्या आहेत. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने विविध खासगी कंपन्यांकडून (Private companies) उमेदवारांची भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाकडे सहा उद्योजकांनी (Entrepreneur) ३९३ जागांसाठी भरती (Recruitment) करण्याची तयारी केली आहे. त्यामध्ये हेल्परपासून टर्नर Turner, फिटर Fitter, इलेक्‍ट्रिशियन Electrician, वेल्डर, सेल्स एक्झिक्‍युटिव्ह आदी पदांचा समावेश आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातच युवकांना नोकरी व रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. (Recruitment For 393 Posts Of Turner Fitter Electrician Welder In Satara District)

कोरोना महामारीत सर्व काही बंद राहिल्याने अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. संसर्ग झाल्यामुळे अनेकांनी ‘गड्या आपला गाव बरा’ असे म्हणत गाव गाठले. त्यामुळे त्यातील काहींनाही आपली नोकरी गमवावी लागली आहे. एकूणच सर्व क्षेत्रात बेरोजगारी वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील तब्बल दीड ते दोन हजार जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तर कोरोनाच्या संसर्गाच्या काळात केवळ दोन जणांनाच नोकरी मिळाली आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अनलॉकचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. संसर्ग कमी होऊ लागल्याने सर्व परिस्थिती पूर्ववत होत आहे. त्यामुळे आता सर्वच क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आरोग्य विभागानेही कोविडच्या पार्श्वभूमीवर जम्‍बो भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा: आजपासून सीएस परीक्षा केंद्रात करा बदल; 'आयसीएसआय'ची अधिसूचना जाहीर

सध्या सातारा जिल्ह्यातील सहा उद्योजकांना ३९३ उमेदवारांची गरज आहे. त्यासाठी त्यांनी रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे तशी मागणी केली आहे. त्यामध्ये हेल्परपासून ते टर्नर, फिटर, इलेक्‍ट्रिशियन, वेल्डर, सेल्स एक्झिक्‍युटिव्ह आदी पदांचा समावेश आहे. हे उद्योजक साताऱ्यातील असल्याने तब्बल ३९३ उमेदवारांना आपल्या जिल्ह्यातच नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. त्यासोबतच कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सध्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांत इच्छुकांनी सहभागी होऊन अपेक्षेप्रमाणे रोजगार मिळवता येणार आहे. त्यामध्ये फिटर, इलेक्‍ट्रिशियन, टुल अॅण्ड डायमेकर, वेल्डर, टर्नर, पेंटर, हेल्पर यांसह पदवीधर, कुशल, अकुशल कामगारांच्या जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा: ज्यानं जगाला हसवलं, त्या 'श्लितजी'ला पालकांनी घराबाहेर हाकललं

आठ हजार उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण

जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आठ हजार उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी चार हजार ६२५ जणांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळाला आहे. त्यामध्ये एकूण ७६ प्रशिक्षण संस्‍था सहभागी झाल्या होत्या. सध्या ६०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

Recruitment For 393 Posts Of Turner Fitter Electrician Welder In Satara District