esakal | Indian Army NCC Recruitment 2021: 15 जूलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army NCC Recruitment 2021: 15
जूलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत

Indian Army NCC Recruitment 2021: 15 जूलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय सैन्यदलातर्फे राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी विशेष प्रवेश योजने अंतर्गत अधिकारी पदाकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. १५) अर्ज भरता येईल.

‘एनसीसी स्पेशल एंट्री’च्या ५० व्या कोर्ससाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. याबाबतची अधिसूचना सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ५५ जागांसाठी उमेदवारांना अर्ज भरता येईल. यामध्ये ५० जागा पुरुष तर, ५ जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: लस अपुरी; पुण्यात फक्त ६८ केंद्रांवर आज लसीकरण

देशातील कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे तसेच, एनसीसीचे ‘सी सर्टिफिकेट’ असणे आवश्‍यक आहे. तर यासाठी वयोमर्यादा १९ ते २५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी तसेच अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना सैन्यदलाच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

loading image