esakal | IISER Recruitment : प्रिन्सिपल टेक्निकल ऑफिसर पदासाठी मोठी भरती; 'असा' करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

IISER Recruitment

IISER Recruitment : प्रिन्सिपल टेक्निकल ऑफिसर पदासाठी मोठी भरती; 'असा' करा अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

IISER, Pune Recruitment 2021 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (Indian Institute of Science Education and Research, IISER), पुणे यांनी विविध पदांसाठी रिक्त जागा सोडल्या आहेत. त्याअंतर्गत प्रिन्सिपल तंत्रशिक्षण अधिकारी (Principal Technical Officer), वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी (Sr.Teaching Associate) व तांत्रिक अधिकारी (Technical Officer) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, या पदांसाठी इच्छुक आणि पात्र अर्जदार विहित अर्जाच्या नमुनाद्वारे 15 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. (Recruitment For The Post Of Principal Technical Officer Senior Teaching Associate In IISER)

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने (IISER) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रिन्सिपल तांत्रिक अधिकारी पदासाठी 1, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी 2 आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या 2 पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना वाचावी लागेल, कारण अर्जामध्ये काही दोष आढळल्यास अर्ज नाकारला जाण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलात 2500 जागांसाठी बंपर भरती; आजच करा अर्ज

IISER, Pune Recruitment 2021 : शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

प्रिन्सिपल तांत्रिक अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून पीएचडी पदवी घेतलेली असावी. याशिवाय संबंधित क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव असावा. 15 मे 2021 रोजी ते 50 वर्षांपेक्षा जास्त नसावेत.

सीनियर टीचिंग असोसिएट या पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून गणिताच्या विषयातून एमएससी पदवी घेतलेली असावी. तसेच 15 मे 2021 पर्यंत उमेदवाराचे वय 45 वर्षे असावे.

तांत्रिक अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून केमिस्ट्री आणि केमिकल सायन्समध्ये एमएससी पदवी घेतली असावी. त्याचबरोबर उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

IISER, Pune Recruitment 2021 : अर्ज कसा करावा

इच्छुक अर्जदारांनी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER), पुणे या जॉब नोटिफिकेशनवर 15 मे रोजी किंवा त्यापूर्वी विहित केलेल्या अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पदाची तपशीलवार माहिती iicep@acads.iiserpune.ac.in या वेबसाइटवरती भरावी लागेल.

Recruitment For The Post Of Principal Technical Officer Senior Teaching Associate In IISER