Jobs : सेबी यंग प्रोफेशनल प्रोग्राममध्ये नोकऱ्या! पगार 60 हजार अन्‌ निवासाची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेबी यंग प्रोफेशनल प्रोग्राममध्ये नोकऱ्या! पगार 60 हजार अन्‌ निवासाची सोय
सेबी यंग प्रोफेशनल प्रोग्राममध्ये नोकऱ्या! पगार 60 हजार अन्‌ निवासाची सोय

सेबी यंग प्रोफेशनल प्रोग्राममध्ये नोकऱ्या! पगार 60 हजार

सेबीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या नवीन उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सिक्‍युरिटीज अँड एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India - SEBI) ने त्यांच्या सिक्‍युरिटीज मार्केट ऑपरेशन्स (Securities Market Operations - SMO), कायदा, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विभागांमध्ये यंग प्रोफेशनल प्रोग्रामसाठी () जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बोर्डाने 4 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, चारही विभागांमध्ये यंग प्रोफेशनल्सच्या एकूण 38 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. SEBI द्वारे यंग प्रोफेशनल प्रोग्राम (Young Professional Program - YPP) अंतर्गत, उमेदवारांना सुरुवातीला एका वर्षासाठी नियुक्त केले जाईल. उमेदवारांच्या कामगिरीवर अवलंबून हा कालावधी प्रत्येकी एक वर्षाच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त दोन वेळा वाढविला जाऊ शकतो. (Recruitment for various positions in SEBI Young Professional Program)

हेही वाचा: भारतीय तटरक्षक दलात नाविक अन्‌ यांत्रिक पदांची मोठी भरती!

जाणून घ्या पात्रता

SEBI ने जारी केलेल्या YPP 2022 च्या जाहिरातीनुसार, यंग प्रोफेशनल्स (SMO) ज्या उमेदवारांनी व्यवस्थापन (फायनान्स) मध्ये किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण केली आहे किंवा CA / CMA किंवा CFA च्या तिन्ही स्तरांमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवले आहेत ते अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवारांना संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे यंग प्रोफेशनल (कायदा) (Law) साठी किमान 60 टक्के गुणांसह कायद्याची पदवी आणि एक वर्षाचा अनुभव असावा.

त्याचप्रमाणे, यंग प्रोफेशनल (संशोधन) (Research) साठी उमेदवाराला 60 टक्के गुणांसह व्यवस्थापन (Management) किंवा अर्थशास्त्र (Economics) किंवा सांख्यिकी (Statistics) या विषयात पीजी आणि संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. तर यंग प्रोफेशनल (आयटी) साठी उमेदवार किमान 60 टक्के गुणांसह आणि एक वर्षाच्या अनुभवासह BE / B.Tech किंवा MCA किंवा MSc (IT) किंवा M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) उत्तीर्ण असले पाहिजेत.

सर्व विभागांमधील यंग प्रोफेशनल पदांसाठी 4 जानेवारी 2022 रोजी उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अशी असेल अर्ज प्रक्रिया

SEBI यंग प्रोफेशनल रिक्रुटमेंट 2022 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट sebi.gov.in वरील करिअर विभागात दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2022 आहे.

हेही वाचा: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकऱ्या! 'या' पदांची भरती

पगार 60 हजार दरमहा अन्‌ राहण्याची

सेबीच्या विहित निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 60 हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल. याशिवाय मुंबईबाहेरील उमेदवारांनाही उपलब्धतेच्या अधीन राहून राहण्याची सुविधा दिली जाईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top