देशातील 'या' मोठ्या बँकेत नोकरीची मोठी संधी; अशी होणार निवड I PNB Recruitment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PNB Recruitment 2022

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालीय.

देशातील 'या' मोठ्या बँकेत नोकरीची मोठी संधी; अशी होणार निवड

PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत (PNB) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालीय. PNB ने मुख्य अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, डिजिटल अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीय. PNB ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार आता 10 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यापूर्वी या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2022 होती. परंतु, आता या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आलीय. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला @pnbindia.in भेट द्यावी लागणार आहे.

PNB ने जारी (Punjab National Bank) केलेल्या अधिसूचनेनुसार, मुख्य अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडं ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून (Global Association of Risk Professionals) व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रासह पदवी किंवा PRMIA संस्थेकडून मिळालेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडं अभियांत्रिकी पदवी किंवा MCA अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील अनुभव असणं गरजेचा आहे. याशिवाय संबंधित क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव असावा, असं स्पष्ट केलंय.

हेही वाचा: 'स्वप्न' साकार! 8 वी पास महिलेची मुलं IPS अधिकारी अन् मुलगी झाली कलेक्टर

असा करा अर्ज

या पदांसाठी पात्र उमेदवार विहित नमुन्यात अर्ज सादर करू शकतात. जे बँकेच्या www.pnbindia.in वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी सर्व कागदपत्रांसह सीलबंद कव्हरमध्ये स्पीड पोस्टद्वारे महाव्यवस्थापक- एचआरएमडी पंजाब नॅशनल बँक एचआर डिव्हिजन 1 ला मजला, वेस्ट विंग, कॉर्पोरेट ऑफिस सेक्टर 10, द्वारका इथं पाठवणं आवश्यक आहे.

Web Title: Recruitment For Various Posts In Punjab National Bank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Punjab National Bank
go to top