esakal | CIPET मध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीतून होणार निवड I CIPET Recruitment
sakal

बोलून बातमी शोधा

CIPET Recruitment 2021

पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

CIPET मध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीतून होणार निवड

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

CIPET Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी! पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत (Central Institute of Petrochemicals Engineering & Technology) विविध पदांची भरती केली जाणार असून यात सिपेट अंतर्गत फॅकल्टी, प्लेसमेंट असिस्टंट, ऑफीस असिस्टंट, मेंटेनन्स असिस्टंट, टेक्निशियन आणि मशीन ऑपरेटर पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

फॅकल्टी (मेकॅनिकल इंजिनीअर) पदाची 1 जागा भरण्यात येणार असून यासाठी बीई/एमई (मेकॅनिकल) मध्ये किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. फॅकल्टी (पॉलिमेकर) प्लास्टिक इंजिनीअरच्या 03 जागा रिक्त असून बीटेक/एमटेकमध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. प्लेसमेंट असिस्टंट पदाची एक जागा आणि ऑफीस असिस्टंट पदाच्या 05 जागा रिक्त असून आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये 50 टक्के गुणांसह पदवी, एमएचसीआयटी, इंग्रजी आणि मराठी टायपिंग येणे गरजेचे आहे.

हेही वाचा: IDBI बँकेच्या 'या' परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा Result

शिवाय, मेंटेनंन्स असिस्टंट पदाची 1 जागा रिक्त असून इलेक्ट्रीकलमध्ये डिप्लोमा आणि एमएचसीआयटी पास असणे गरजेचे आहे. टेक्निकल पदाची एक जागा रिक्त असून पीजी डिप्लोमा, बीएससी/एमएससी (केमिस्ट्री), बायोकेमिस्ट्री, एमएचसीआयटी असणे गरजेचे आहे. मशिन ऑपरेटर (प्रोसेसिंग) च्या 3 जागा रिक्त असून इंजेक्शन अॅण्ड ब्लो मशिन ऑपरेटरचा शॉर्ट टर्म कोर्स असणे गरजेचे आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी 8 ऑक्टोबर 2021 रोजी मुलाखातीकरिता उपस्थित राहावे. यासाठी सीआयपीईटी, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (सीएसटीएस), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद- 431006 या पत्त्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: NDA, NA मध्ये फक्त 400 जागा; महिला उमेदवारांची संख्या वाढणार?

loading image
go to top