BSF Job | बीएसएफमध्ये मोठी भरती; १०वी उत्तीर्णांना मिळणार संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSF

BSF Job : बीएसएफमध्ये मोठी भरती; १०वी उत्तीर्णांना मिळणार संधी

मुंबई : सीमा सुरक्षा दलात (BSF) कॉन्स्टेबल पदावर भरती करण्यात येत आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या १० वी उत्तीर्णांसाठी ही चांगली संधी आहे. याबाबतची अधिसूचना rectt.bsf.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी... (recruitment in BSF )

या भरतीसाठीची अधिकृत अर्ज प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार rectt.bsf.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च आहे.

ही भरती प्रक्रिया १२८४ पदांसाठी राबवली जात आहे. त्यापैकी १२०० पदे पुरुषांसाठी तर ८४ पदे महिलांसाठी आहेत.

रिक्त पदांची संख्या

कॉन्स्टेबल कॉबलर - २३

कॉन्सटेबल वॉटर कॅरिअर - २९४

कॉन्स्टेबल कूक - ४८०

कॉन्स्टेबल स्वीपर - २७७

कॉन्स्टेबल टेलर - १३

कॉन्स्टेबल वॉशर मॅन - १३२

कॉन्स्टेबल बार्बर - ६०

कॉन्स्टेबल वेटर - ५

अर्ज कोण करू शकतात ?

मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १०वी उत्तीर्ण झालेले उमेदवार.

कामाशी संबंधित आयटीआय किंवा एसीव्हीटी प्रमाणपत्र असावे.

वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर शारीरिक पात्रता चाचणी होईल व कागदपत्रं पडताळणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीलाही सामोरे जावे लागेल. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.