CRPF Job | सीआरपीएफमध्ये ९००० जागांवर भरती; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार recruitment in CRPF on 9 thousand posts constable job | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CRPF

CRPF Job : सीआरपीएफमध्ये ९००० जागांवर भरती; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार

मुंबई : केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) ९ हजारांहून अधिक कॉन्स्टेबल (तांत्रिक आणि व्यापारी) च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.crpf.gov.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होईल आणि २४ एप्रिलला संपेल. अधिसूचनेनुसार, अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीसाठी १ ते १३ जुलै २०२३ या कालावधीत संगणक-आधारित परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी प्रवेशपत्र २० जून रोजी प्रसिद्ध केले जातील. (recruitment in CRPF on 9 thousand posts constable job )

लेखी परीक्षेव्यतिरिक्त, भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), व्यापार चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा देखील समाविष्ट आहेत.

एकूण ९,२१२ पदे भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी ९,१०५ पदे पुरुष आणि १०७ महिला उमेदवारांसाठी आहेत. निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर 3 : रु.२१,७०० - ६९,१०० मिळेल.

वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता निकष, वयोमर्यादा इत्यादी भिन्न आहेत. अशा परिस्थितीत, उमेदवारांनी अधिक तपशीलांसाठी अधिसूचना वाचवी.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्याच वेळी, SC/ST चे उमेदवार, महिला (सर्व श्रेणी) उमेदवार आणि माजी सैनिक यांना सूट देण्यात आली आहे.

CRPF भरतीसाठी अर्ज कसा करावा

सर्वप्रथम CRPF च्या अधिकृत वेबसाईटवर जा.

त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.

CRPF चा फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर फॉर्म फी भरा आणि फायनल सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.