Job Alert | केंद्र सरकारी नोकरीची मोठी संधी; कर्मचारी निवड आयोगातर्फे हजारो पदांवर भरती SSC CGL Notification 2023 staff selection commission | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job Alert

Job Alert : केंद्र सरकारी नोकरीची मोठी संधी; कर्मचारी निवड आयोगातर्फे हजारो पदांवर भरती

मुंबई : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कम्बाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. आयोगाने भरतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार १ एप्रिल २०२३ पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. त्याचबरोबर उमेदवारांना १ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील अर्ज करू शकतील. हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान? (SSC CGL Notification 2023)

या विभागांमध्ये नियुक्त्या करण्यात येणार आहेत

भरतीद्वारे केंद्र सरकारची मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त्या केल्या जातील. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या या भरतीतून हजारो पदे भरली जातील, असे मानले जात आहे. मात्र, आयोगाकडून रिक्त पदांच्या संख्येची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

आयोग सध्या २०२२ च्या परीक्षेची तयारी करत आहे. २०२२च्या भरतीद्वारे ३७ हजार पदांसाठी नियुक्त्या केल्या जात आहेत. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

वय श्रेणी

१८ ते २७ वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता असेल. अधिक तपशील उमेदवार अधिसूचनेवर जाऊन तपासू शकतात.

याप्रमाणे अर्ज करा

सर्वप्रथम ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर CGL Recruitment लिंकवर क्लिक करा.

यानंतर CGL 2023 चा फॉर्म भरा.

फॉर्म भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

CGL फी भरा.

यानंतर, CGL फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.