India post payment bankमध्ये ६५० पदांवर भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPPB

India post payment bankमध्ये ६५० पदांवर भरती

मुंबई : तुम्ही बँकींग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर india post payment bankमध्ये (IPPB) अर्ज करू शकता. IPPBने ६५० पदांवर भरती सुरू केली आहे. ippbonline.com या संकेतस्थळावर २० मेपर्यंत अर्ज करता येईल.

हेही वाचा: आयटीआय पात्रताधारकांना टपाल विभागात नोकरीची संधी; सातव्या आयोगानुसार वेतन

अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी जूनमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज केल्यानंतर ७ ते १० दिवसांत परीक्षेचे प्रवेशपत्र मिळेल. यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय ३० एप्रिल २०२२ पर्यंत २५ ते ३० वर्षे असावे. अर्जासाठी ७५० रुपये भरणे आवश्यक आहे. दर महिन्याला ३० हजार रुपये वेतन दिले जाईल.

हेही वाचा: ग्राहक बाजाराकडे फिरकता फिरकेना, टपाल विभाग म्हणतो, ‘वुई आर रेडी’,...

असा करा अर्ज

ippbonline.com या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. Careers सेक्शनमध्ये जाऊन GDS भरतीमध्ये Click here to applyवर क्लिक करावे. यानंतर Click here for new registration यावर क्लिक करावे. नोंदणी करून झाल्यावर अर्ज व शुल्क भरावे. त्यानंतर अर्जाची छापील प्रत घ्यावी.

Web Title: Recruitment In India Post Payment Bank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Postal Department
go to top