
आयटीआय पात्रताधारकांना टपाल विभागात नोकरीची संधी; सातव्या आयोगानुसार वेतन
मुंबई : भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयाने सामान्य केंद्रीय सेवा, गट सी, अराजपत्रित, अ-मंत्रालयी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ मे आहे.
हेही वाचा: ‘अलबत्या-गलबत्या’ची भारतीय टपाल विभागानं घेतली दखल
पदांची संख्या
मोटर मेकॅनिकसाठी ५ पदे, इलेक्ट्रीशनसाठी २ पदे, टायरमनसाठी १ पद, लोहारासाठी १ पद रिक्त आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात आयटीआय पूर्ण केलेले असणे आवश्यकआहे. तसेच मोटर मेकॅनिक पदासाठी अर्ज असणाऱ्याकडे अधिकृत अनुज्ञप्ती (liscence) असणे आवश्यक आहे.
हेही वाचा: आयकर विभागात सरकारी नोकरीची संधी; 'या' जागांसाठी होणार भरती
वेतन
कुशल कामगारांना १९ हजार ९०० रुपये वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा
१ जुलै २०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे असावे. उच्च वयोमर्यादेत एसटीसाठी ५ वर्षे, ओबीसी नॉन-क्रिमी लेयरसाठी ३ वर्षे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३५ वर्षांपर्यंत सवलत असेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षेच्या अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि ठिकाण उमेदवारांना पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर स्वतंत्रपणे दिले जाईल.
अर्ज कसा करायचा ?
अर्ज स्पीड पोस्टने किंवा नोंदणीकृत टपालाने वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, १३४-ए, एसके अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८ वर पाठवावेत. अधिक माहितीसाठी भारतीय टपाल विभागाच्या https://www.indiapost.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Web Title: Recruitment In India Post For Iti Pass Out Salary As Per 7th Pay Commission
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..