भारतीय सैन्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवताण.... ४० जागांवर भरती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय सैन्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवताण.... ४० जागांवर भरती सुरू

भारतीय सैन्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवताण.... ४० जागांवर भरती सुरू

मुंबई : भारतीय सैन्यात technical graduate course साठी भरती सुरू करण्यात आली आहे. अभियांत्रिकीची पदवी असणारे यासाठी अर्ज करू शकतात. कायमस्वरुपी कमिशनसाठी जानेवारी २०२३ पासून IMA डेहराडून येथे सुरू होणाऱ्या १३६व्या technical graduate course ही भरती करण्यात येत आहे. joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ९ जूनपर्यंत अर्ज करता येईल.

रिक्त जागांचा तपशील

सिविल - ९
आर्किटेक्चर - १
मेकॅनिकल - ६
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स - ३
संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी / संगणक तंत्रज्ञान / संगणकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी - ८
आईटी - ३
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन - १
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन - ३
एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस - १
इलेक्ट्रॉनिक्स - १
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन - १
प्रोडक्शन - १
इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चुरिंग/ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग अॅण्ड मॅनेजमेंट- १
ऑटोमोबाइल इंजीनियरिंग - १

पात्रता

अभियांत्रिकी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात. जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला शिकत असतील तेही अर्ज करू शकतात; मात्र त्यांना १ जानेवारी २०२३ पर्यंत पदवी मिळणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना आयएमएमधील प्रशिक्षणादरम्यान १२ आठवड्यांमध्ये पदवी सादर करणे आवश्यक असेल. वय वर्षे २० ते २७ दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९६ ते १ जानेवारी २००३ या दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.

निवडप्रक्रिया

उमेदवारांना अभियांत्रिकीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जाईल. त्यानंतर मुलाखत व वैद्यकीय चाचणी होईल.