
ONGCमध्ये काम करण्याची मोठी संधी..... असा करा अर्ज
मुंबई : ONGCने ९००हून अधिक गैरकार्यकारी पदांवर भरती सुरू केली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे आहे. इच्छुक उमेदवार ongcindia.com या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.
हेही वाचा: 'ओएनजीसी'ची 'जीटी' पदांसंदर्भात महत्त्वाची अधिसूचना !
या पदांवर भरती सुरू...
कनिष्ठ अभियांत्रिकी साहाय्यक ( सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रूमेंटेशन, मेकॅनिकल बॉयलर, प्रोडक्शन, सीमेंटिंग, ड्रिलिंग, प्रोडक्शन-ड्रिलिंग )
कनिष्ठ शास्त्रीय साहाय्यक (केमिस्ट्री, जिऑलॉजी, जियोफिजिक्स - सर्फेस)
कनिष्ठ साहाय्यक (अकाउंट, एमएम, राजभाषा, पी अॅण्ड एम)
कनिष्ठ फायर सुपरवाइजर
कनिष्ठ तांत्रिकी साहाय्यक (सर्वेयिंग, केमिस्ट्री, जिऑलॉजी)
कनिष्ठ तंत्रज्ञ (फिटिंग, वेल्डिंग, डीझेल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, सीमेंटिंग, मशीनिंग, बॉयलर, प्रोडक्शन-ड्रिलिंग)
ज्युनिअर फायरमन
कनिष्ठ समुद्री रेडिओ साहाय्यक
कनिष्ठ डीलिंग साहाय्यक (परिवहन, एमएम)
कनिष्ठ वाहन चालक (विन्च ऑपरेशन)
कनिष्ठ साहाय्यक ऑपरेटर (अवजड उपकरणे)
ज्युनिअर स्लिंगर कम रिगर
हेही वाचा: ओएनजीसी आता ‘एचपीसीएल’ ताब्यात घेणार?
शैक्षणिक पात्रता निकष
जेईए - अभियांत्रिकी पदविका
जेएमआरए- १२वी उत्तीर्ण किंवा १० उत्तीर्णसह GMDSS प्रमाणासह इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकॉम या विषयातील पदविका
जेडीए ट्रान्सपोर्ट - ऑटो/मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये ३ वर्षांची पदविका / बिजनेस मॅनेजमेंट/अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका
जेएसए - पदव्युत्तर पदवी
कनिष्ठ तंत्रज्ञ - १२वी उत्तीर्ण किंवा ट्रेड सर्टिफिकेटसह १०वी उत्तीर्ण
JAO- बारावी उत्तीर्ण किंवा ड्रायव्हिंग लायसन्ससह दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्षांचा अनुभव
JSCR- बारावी उत्तीर्ण किंवा ड्रायव्हिंग लायसन्ससह दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्षांचा अनुभव
उमेदवारांसाठी आधी संगणकाधारित परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर कौशल्य परीक्षा आयोजित केली जाईल. ज्या पदासाठी आवश्यक असेल त्यासाठी टायपिंग परीक्षाही आयोजित केली जाईल. www.ongcindia.com या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.
Web Title: Recruitment In Ongc How To Apply
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..