IT Jobs: 'नोकरी जॉबस्पीक निर्देशांका'नुसार आयटी क्षेत्रात भरती घटली

आयटी क्षेत्रात भरती घटली: नोकरी जॉब्सपीक
office
officesakal

जागतिक मंदीच्या सावटामुळे सध्या जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यानी नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांमध्ये चिंतेच वातावारण आहे. कारण अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असतानाच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात असल्यामुळे आपणाला नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. 

जवळपास प्रतिमहिना 10 लाख रोजगारांवर आधारित भारतातील नियुक्तीचे सर्वात अचूक परिमाण देणा-या नोकऱ्या जॉबस्पीक निर्देशांकानुसार जून 2023 मध्ये आयटी क्षेत्रातील रोजगार भरतीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट आणि फार्मा क्षेत्रातील नोक-यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या क्षेत्रात नोकरभरतीमध्ये अनुक्रमे 40 टक्के, 17 टक्के आणि 14 टक्के वाढ झाली आहे.

जून २०२३ मध्ये भारतातील व्हाइट-कॉलर नियुक्ती उत्तम राहिली. जाहिरातींची संख्या २७९५ झाली. ती गेल्यावर्षी ८७८ इतकी होती. भरतीच्या जाहिराती मासिक आधारावर २ टक्के घटल्या आहेत. टेक क्षेत्र व मेट्रो शहरांमधील व्हाइट कॉलर रोजगारांची संख्या खूप कमी झाली, तसेच नॉन-मेट्रो शहरामधील रिअल इस्टेट व ऊर्जा क्षेत्रांतील रोजगारांच्या संख्येने या घटवर मात करत रोजगार बाजारपेठ स्थिर ठेवली आहे.

आयटी क्षेत्रामधील नियुक्ती चिंतेचा विषय म्हणून कायम राहिला आहे, गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये ३१ टक्क्यांची देखील घट झाली. ही घट प्रामुख्याने सर्व प्रकारच्या आयटी कंपन्यांमध्ये दिसण्यात आली आहे, ज्यामध्ये टेक कंपन्या, आयटी सर्विस कंपन्या, तंत्रज्ञान-केंद्रित स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सचा देखील समावेश होता.

तसेच सर्व मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांतील नियुक्तीमध्ये घट झाली आहे. जेथे बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई व पुणे यांसारख्या आयटीवर अवलंबून असलेल्या मेट्रो शहरांचे नुकसान झाले आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स व सिस्टम अॅनालिस्ट्स यांसारख्या पदांमध्ये घट दिसण्यात आली.

ऑईल अॅण्ड गॅस, रिअल इस्टेट आणि फार्मा क्षेत्रात नोकर भरती


ऑईल अॅण्ड गॅस क्षेत्रातील रोजगारांमध्ये वाढ होण्याचे श्रेय फास्ट रिफायनरी विस्तारीकरण आणि वाढत्या देशांतर्गत व निर्यात मागणीची पूर्तता करण्यासाठी सहाय्यक पदांना जाते.

तसेच अहमदाबाद, मुंबई व दिल्ली एनसीआर येथे प्रमुख पदांसाठी अधिक नियुक्ती दिसण्यात अली आहे, ज्यामध्ये एक्स्प्लोरेशन रिफायनरी ऑपरेशन्स मॅनेजर्स आणि हेल्थ, इंजीनिअर्स, सेफ्टी अॅण्ड एन्व्हायरोन्मेंट स्पेशालिस्ट्स यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्राने रोजगारांमध्ये १७ टक्के वाढ करत आपली यशोगाथा कायम ठेवली.

तसेच गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत फार्मा क्षेत्राने रोजगारांमध्ये १४ टक्क्यांची वाढ केली. औषध विभागामध्ये स्थिर आरअॅण्डडी गुंतवणूकांमुळे चालना मिळत अहमदाबाद, चेन्नई व पुणे बायोटेक्नॉलॉजिस्ट्स, क्लिनिकल रिसर्च अॅनालिस्ट्स व क्वॉलिटी अशुरन्स स्पेशालिस्ट्ससाठी पसंतीचे गंतव्य म्हणून उदयास आले.

हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाइल, व बँकिंग या इतर काही क्षेत्रांमध्ये गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये अनुक्रमे १२ टक्के, ११ टक्के व ११ टक्के वाढीसह सकारात्मक नियुक्ती भावना दिसण्यात आली.

नोकरीडॉटकॉमचे मुख्‍य व्यवसाय अधिकारी पवन गोयल म्हणाले, ‘‘व्हाइट कॉलर रोजगार बाजारपेठेमध्ये आमूलाग्र बदल दिसण्यात येत आहे. व्हाइट कॉलर रोजगारामध्ये टेक क्षेत्रातील आणि अव्‍वल मेट्रो शहरांमधील वाढ होण्याकरिता प्रमुख स्रोत राहिले आहेत.

नुकतेच ऑईल अॅण्ड गॅस, फार्मा, रिअल इस्टेट आणि बीएफएसआय यांसारख्या उदयोन्‍मुख विभागांमधील रोजगार हे रोजगार वाढीसाठी मोठे योगदानकर्ते म्हणून उदयास आले आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com