NIC Job | राष्ट्रीय माहिती केंद्रात भरती; दीड लाखांहून अधिक पगार घेण्याची संधी recruitment in national information centre | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIC

NIC Job : राष्ट्रीय माहिती केंद्रात भरती; दीड लाखांहून अधिक पगार घेण्याची संधी

मुंबई : राष्ट्रीय माहिती केंद्राने (NIC) पदवीधारकांसाठी अनेक पदांवर भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक यांसारखी इतर ५९८ पदे भरली जातील. (NIC Vacancy 2023)

या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला NIC च्या अधिकृत वेबसाइट recruitment.nic.in ला भेट द्यावी लागेल आणि अर्जाचा तपशील मिळवावा लागेल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२३ आहे. (recruitment in national information centre ) हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

रिक्त जागा तपशील

या भरतीतून एकूण ५९८ पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये वैज्ञानिक बी च्या 71 पदे, वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या 196 पदे आणि तांत्रिक सहाय्यकाच्या 331 पदे आहेत.

महत्त्वाची तारीख

एनआयसी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ४ मार्चपासून सुरू झाली असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत वेळ देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी नोंद घ्यावी की सर्व पदांच्या भरतीसाठी पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.

वय मर्यादा

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३० वर्षांपेक्षा जास्त नसावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

पगार

वैज्ञानिक बी पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर 10 नुसार 56,100 ते 1,77,500 रुपये वेतन दिले जाईल, तर वैज्ञानिक अधिकाऱ्यांना स्तर 7 नुसार 44,900 ते 1,42,400 रुपये दिले जातील. यासह, तांत्रिक सहाय्यक पदांवरील लेव्हल 6 पदांसाठी 35,400 ते 1,12,400 रुपये दिले जातील.

टॅग्स :Recruitmentjob