
Government Job : लाखो रुपये मिळणार पगार; १२वी उत्तीर्णांपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांना संधी
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना राष्ट्रीय जल विकास संस्थेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. येथे अनेक पदांसाठी भरती निघाली असून, त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीच्या या पदांसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात. हे करण्यासाठी, NWDA च्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता आहे – nwda.gov.in.
अर्ज सुरू झाले आहेत त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन असतील, इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. (recruitment in national water development agency government job for 12th pass and graduates) हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
महत्त्वाच्या तारखा
या भरती मोहिमेद्वारे ४० विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठीचे अर्ज १८ मार्चपासून सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२३ आहे.
रिक्त जागांचा तपशील
या भरती मोहिमेद्वारे एकूण ४० पदांची भरती केली जाईल.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १३ पदे
कनिष्ठ लेखाधिकारी (JAO) १ पद
ड्राफ्ट्समन ग्रेड III – ६ पदे
अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – ७ पदे
स्टेनोग्राफर ग्रेड – II – ९ पदे
निम्न विभाग लिपिक – ४ पदे
कोण अर्ज करू शकतो
या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे. उदाहरणार्थ, सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा असलेले कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करू शकतात.
स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी १२वी पास अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा काय आहे
कनिष्ठ लेखाधिकारी पदासाठी वय मर्यादा २१ ते ३० वर्षे आहे. उर्वरित पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या पदांवरील निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. उदा. - लेखी चाचणी, कौशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.
इतकी फी भरावी लागेल आणि इतका पगार मिळेल
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना ८९० रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWD श्रेणीसाठी ५०० रुपये शुल्क आहे. निवड झाल्यावर पदानुसार वेतन मिळते.
काही पदांसाठी एका महिन्यात एक लाखापेक्षा जास्त पगार मिळू शकतो, तर काहींसाठी ते ८० हजार रुपयांपर्यंत असू शकते.