esakal | 'ओएनजीसी'ची 'जीटी' पदांसंदर्भात महत्त्वाची अधिसूचना! जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

'ओएनजीसी'ची 'जीटी' पदांसंदर्भात महत्त्वाची अधिसूचना! जाणून घ्या सविस्तर

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) ने पदवीधर प्रशिक्षणार्थी (जीटी) पदांच्या भरतीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे.

'ओएनजीसी'ची 'जीटी' पदांसंदर्भात महत्त्वाची अधिसूचना !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (Oil and Natural Gas Corporation Limited) (ओएनजीसी) ने पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) (GT) पदांच्या भरतीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ongcindia.com ला भेट देऊन नवीन अपडेट्‌स तपासत राहावे, जेणेकरून त्यांना नोंदणीच्या तारखांची माहिती होईल. या पदांवर भरती प्रक्रिया गेट परीक्षेद्वारे होईल.

हेही वाचा: एक्‍झिक्‍युटिव्ह पदांसाठी 'हिंदुस्थान फर्टिलायझर्स'मध्ये भरती!

ओएनजीसीच्या सूचनेनुसार, जीटी भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया गेट 2020 आणि गेट 2021 च्या स्कोअरद्वारे सुरू करण्याबाबत उमेदवारांकडून विविध प्रश्न प्राप्त होत आहेत. तर उमेदवारांना कळवले जाते की, काही तांत्रिक कारणांमुळे अजूनही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. आशा आहे की तांत्रिक कारणे लवकरच सोडवली जातील. यानंतर GATE 2020 स्कोअरद्वारे पदवीधर प्रशिक्षणार्थी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर, GATE 2021 स्कोअरद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल.

हेही वाचा: 'आयसीएआय'ने सीए परीक्षेसंदर्भात जाहीर केली महत्त्वपूर्ण अधिसूचना!

अलीकडेच ONGC ने GATE 2020 स्कोअरद्वारे पदवीधर प्रशिक्षणार्थी भरतीसाठी एक नोटीसही प्रकाशित केली; परंतु प्रशासकीय कारणांमुळे आणि देशात सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे भरती प्रक्रिया लांबली आहे. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य उमेदवारांचे वय 30 वर्षे असावे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 33 वर्षे असावे. याशिवाय एससी आणि एसटी उमेदवारांचे वय 35 वर्षे असावे. भरती प्रक्रियेच्या सुरवातीला उमेदवार ONGC च्या वेबसाइट www.ongcindia.com द्वारे पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासह भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत पोर्टलवरील अधिसूचना वाचू शकतात.

loading image
go to top