Bank Job | स्टेट बँकेत ८६८ पदांवर भरती; लेखी परीक्षेशिवाय होणार उमेदवारांची निवड recruitment in state bank of india job for senior citizens | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Job

Bank Job : स्टेट बँकेत ८६८ पदांवर भरती; लेखी परीक्षेशिवाय होणार उमेदवारांची निवड

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटरच्या पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीतून एकूण ८६८ पदे भरली जाणार आहेत.

या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २१ मार्च २०२३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. (recruitment in state bank of india) हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

रिक्त जागांचा तपशील

SBI मध्ये या भरतीद्वारे एकूण ८६८ पदे भरली जाणार आहेत.

महत्वाची तारीख

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १० मार्चपासून सुरू झाली असून ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे.

पात्रता

SBI मधून निवृत्त अधिकारी असलेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांना मुलाखतीद्वारे शॉर्टलिस्ट केले जाईल.

अर्ज कसा करावा ?

१. - नोंदणी करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.sbi.co.in/careers वर जा.

२. - दुसऱ्या टप्प्यात वेबसाइटच्या होमपेजवर स्वतःची नोंदणी करा.

३. - नोंदणी केल्यानंतर, अर्ज भरा आणि सबमिट करा.

४. - शेवटी पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

टॅग्स :BankingBankRecruitmentjob