UPSC Job : केंद्रीय लोकसेवा आयोगात ७३ पदांवर भरती; लगेच करा अर्ज

या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे.
UPSC
UPSC google

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सहाय्यक नियंत्रक आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

या भरतीद्वारे एकूण ७३ पदे भरली जाणार आहेत, ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२३ ठेवण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करण्याची संधी दिली जाणार नाही. (UPSC Recruitment 2023) हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

UPSC
Job Alert : १०वी उत्तीर्णांची नौदलात भरती; ६० हजारांहून अधिक पगार घेण्याची संधी

रिक्त जागांचा तपशील (recruitment in UPSC )

एकूण पदे- ७३

फोरमॅन (एरोनॉटिकल) – 1 पद

फोरमन (केमिकल) – ४ पदे

फोरमन (IT) – २ पदे

फोरमन (इलेक्ट्रिकल) – 1 पद

फोरमन (इलेक्ट्रॉनिक्स) – 1 पद

फोरमन (मेटलर्जी) – २ पदे

फोरमॅन (टेक्सटाईल) – २ पदे

उपसंचालक – १२ पदे

सहाय्यक नियंत्रक - 47 पदे

कामगार अधिकारी - 1 पद

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 11 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 2 मार्च 2023

UPSC
Job Alert : इनकम टॅक्स विभागात दहावी उत्तीर्ण आणि पदवीधरांची भरती; दीड लाखांपर्यंत मिळणार पगार

शैक्षणिक पात्रता

या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवाराने भरती अधिसूचनेमध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार माहिती मिळवावी.

वय

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 30 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागतील, तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com