
मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली 247 लिपिक पदांची भरती!
लिपिकाची नोकरी (Government Job) शोधणाऱ्या इच्छुकांसाठी सरकारी नोकरीची बातमी. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) 247 लिपिक पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 13 डिसेंबर 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 23 डिसेंबर 2021 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. लिपिक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उच्च न्यायालयाने 6 जानेवारी 2022 निश्चित केली आहे. (Recruitment of 247 clerical posts started in Mumbai High Court)
हेही वाचा: नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 15 टक्क्यांपेक्षा कमी अर्ज
असा करा अर्ज
मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2022 साठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in ला भेट द्यावी लागेल आणि नंतर भरती विभागात जावे लागेल. लिपिक पदांसाठी अधिसूचना आणि ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक भरती पेजवर दिली आहे. तथापि, उमेदवार अधिसूचना डाउनलोड करून ऍप्लिकेशन पेजवर भेट देऊ शकतात. अर्जादरम्यान उमेदवारांनी नोंदणी शुल्क 25 रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करावे. तथापि, अधिकृत वेबसाइटवर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना 250 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
हेही वाचा: लसीचे प्रमाणपत्र नाही तर वेतन नाही! पंजाब सरकारचे आदेश
जाणून घ्या पात्रता व निकष
मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2022 अधिसूचनेनुसार इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, संगणक टायपिंगमधील मूलभूत अभ्यासक्रम किंवा इंग्रजी टायपिंगमधील ITI प्रमाणपत्र आणि उमेदवारांचा टायपिंगचा वेग किमान 40 wpm असावा. याशिवाय, अर्ज प्रकाशित केल्याच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे.
Web Title: Recruitment Of 247 Clerical Posts Started In Mumbai High Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..