Jobs : इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये अप्रेंटिस पदांची भरती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदुस्थान पेट्रोलियम
इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये अप्रेंटिस पदांची भरती!

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited - HPCL) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत 100 पदांवर नियुक्‍त्या करण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र उमेदवार HPCL च्या hpclcareers.com या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अधिसूचना तपासू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे, की या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. वास्तविक, या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया 14 जानेवारी रोजी संपेल. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी तो दोन दिवसांत तो सादर करावा. त्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही. (Recruitment of Apprentice Posts in Hindustan Petroleum for Engineering Candidates)

हेही वाचा: संरक्षण मंत्रालयात सिव्हिलियन्स भरती! 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांकरिता अर्ज करण्यासाठी 1 एप्रिल 2019 नंतर तुमच्याकडे अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree) असणे आवश्‍यक आहे. तसेच, 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी पात्र असणार नाहीत. त्याच वेळी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 7 जानेवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, ज्या उमेदवारांनी 14 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी NATS पोर्टलद्वारे अर्ज केला आहे त्यांचा निवडीसाठी विचार केला जाईल. अर्ज करताना उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसार अर्ज करावा, कारण फॉर्ममध्ये काही तफावत आढळल्यास अर्ज अवैध ठरेल.

हेही वाचा: आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 शिक्षक पदांची भरती! अर्जप्रक्रिया सुरू

अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड फक्त एक वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल. तर पदवीधर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी म्हणून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार रुपये दिले जातील. भरती प्रक्रियेशी संबंधितश माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top