Jobs : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती!

केंद्रीय गृह मंत्रालया (Union Home Ministry) अंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (Central Industrial Security Force - CISF) ने हेड कॉन्स्टेबल (Head Constable) (जनरल ड्यूटी) पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. CISF ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, विविध खेळांच्या विहित क्रीडा (Sports) कोट्याअंतर्गत एकूण 249 पदांची भरती करायची आहे. इच्छुक उमेदवार CSIF च्या अधिकृत भरती पोर्टल cisfrectt.in वर दिलेल्या फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. तथापि, ईशान्य विभागातील उमेदवारांसाठी अंतिम तारीख 7 एप्रिल 2022 आहे. (Recruitment of Head Constable in Central Industrial Security Force)

कोण करू शकतो अर्ज?

CISF द्वारे प्रसिद्ध केलेल्या स्पोर्टस्‌ कोटा हेड कॉन्स्टेबल भरती जाहिरातीनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांनी 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2022 दरम्यान आयोजित राज्य (State), राष्ट्रीय (National) आणि आंतरराष्ट्रीय (International) स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असावा. याव्यतिरिक्त 1 ऑगस्ट 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. याचा अर्थ उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2003 नंतर झालेला नसावा. तथापि, विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता आहे, अधिक तपशिलांसाठी भरती जाहिरात पाहा.

जाणून घ्या निवड प्रक्रिया

सीआयएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांकरिता उमेदवारांच्या निवडीसाठी विहित प्रक्रियेच्या टप्प्यांमध्ये शारीरिक मानक चाचणी (Physical Standard Test - PST), दस्तऐवजीकरण आणि प्रवीणता चाचणी या टप्प्यांचा समावेश होतो. प्रत्येक टप्पा पार पडल्यानंतर, मागील टप्प्याच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात उपस्थित राहण्यासाठी प्रवेशपत्रे दिली जातील.

टॅग्स :viraleducationjobsupdate