ISRO मध्ये निघाली 'जेटीओ' पदांची भरती! दरमहा वेतन 1.12 लाख रुपये

इस्रोमध्ये निघाली जेटीओ पदांची भरती! दरमहा वेतन 1.12 लाख रुपये
ISRO
ISROSakal
Summary

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये (HSFC) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सोलापूर : इस्रोमध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian Space Research Organization - ISRO) ने ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये (Human Space Flight Center - HSFC) भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 30 ऑक्‍टोबर 2021 रोजी संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिराती (No. HSFC/02/RMT/2021) नुसार, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसरच्या (JTO) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ISRO ने एकूण 6 JTO पदांसाठी अर्ज मागवले आहेत, त्यापैकी 5 पदे अनारक्षित आहेत, तर उर्वरित 1 पद SC उमेदवारांसाठी राखीव आहे.

अशी राहील अर्ज प्रक्रिया

इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमधील ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सुरू झाली असून, उमेदवार 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान, उमेदवारांना 250 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग) भरता येईल. तथापि, इस्रोने उमेदवारांना ऑफलाइन फी भरण्याचा पर्याय देखील दिला आहे आणि उमेदवार एसबीआय चलनाद्वारे अर्ज फी भरू शकतात.

ISRO
आज जाहीर होऊ शकतो NEET चा निकाल अन्‌ फायनल अ‍ॅन्सर की!

इस्रो जेटीओ भरतीसाठी पात्रता निकष

इस्रोने जारी केलेल्या JTO भरती अधिसूचनेनुसार, केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे आणि पदवी स्तरावर इंग्रजी हा विषय किंवा माध्यम म्हणून परीक्षा दिलेली आहे. तसेच, 20 नोव्हेंबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अनारक्षित पदांसाठी राखीव श्रेणींमध्ये वयोमर्यादेत कोणतीही सवलत दिली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com