esakal | DRDO करतेय रिसर्च असोसिएट्‌स पदांची भरती! 54000 रुपये वेतन; जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

DRDO करतेय रिसर्च असोसिएट्‌स पदांची भरती! 54000 रुपये वेतन; जाणून घ्या सविस्तर

DRDO INMAS भरती 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.

DRDO करतेय रिसर्च असोसिएट्‌स पदांची भरती! 54000 रुपये वेतन

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) (Defense Research and Development Organization) च्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्‍लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) (Institute of Nuclear Medicine and Allied Sciences) रिसर्च असोसिएट (RA) (Research Associate) आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) (Junior Research Fellowship) कनिष्ठ पदांसाठी अर्ज मागवत आहे. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार त्यांचे अर्ज inmasrf@gmail.com वर पाठवू शकतात.

हेही वाचा: भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!

DRDO INMAS भरती 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे. ही DRDO INMAS भरती मोहीम चार संशोधन सहयोगी आणि सहा कनिष्ठ संशोधन सहयोगी पदांसाठी राबवली जात आहे. DRDO INMAS च्या अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे, की संस्थेच्या गरजेनुसार रिक्त पदांची संख्या बदलूही शकते. या पदांवर इच्छुक उमेदवारांनी DRDO INMAS च्या अधिसूचनेनुसार 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत.

हेही वाचा: अकरावी प्रवेशाचा कट ऑफ घसरला! कला शाखेला जागेवरच प्रवेश

मुंबईतील ईसीएचएस पॉलिक्‍लिनिकमध्ये वैद्यकीय पदांसाठी होणार भरती

ईसीएचएस पॉलिक्‍लिनिक मुंबई (ECHS Mumbai Recruitment 2021) येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. दंत अधिकारी, दंत सहाय्यक या पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर आहे.

ईसीएचएस पॉलिक्‍लिनिक मुंबई येथे दंत अधिकारी (Dental Officer) 1 पद व सहाय्यक (Dental Assistant) 1 पद भरले जाणार आहे. दंत अधिकारी पदासाठी BDS व सहाय्यक पदासाठी GNM डिप्लोमा असिस्टंट कोर्स (आर्म्ड फोर्सेस) ही पात्रत आहे. उमेदवार karwar@echs.gov.in या ई-मेलवर अर्ज करू शकतात.

loading image
go to top