Jobs : भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 149 पदांची भरती! 'असे' करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 149 पदांची भरती! 'असे' करा अर्ज
भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 149 पदांची भरती! 'असे' करा अर्ज

भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 149 पदांची भरती! 'असे' करा अर्ज

भारतीय सरकारी करन्सी नोट प्रेसमध्ये (Indian Government Currency Note Press) सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी. सिक्‍युरिटीज प्रिंटिंग अँड मॅन्युफॅक्‍चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Securities Printing and Manufacturing Corporation of India Limited - SPMCIL) ही संपूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची एक मिनीरत्न कंपनी आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक आहे. करन्सी नोट प्रेस (CNP) नाशिक रोड (Currency Note Press (CNP), Nashik Road) ही देशातील एकूण 9 युनिट्‌सपैकी एक आहे. याद्वारे विविध स्तरांवर एकूण 149 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण / नियंत्रण आणि कार्यशाळा), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, सचिवीय सहाय्यक, पर्यवेक्षक (तांत्रिक - नियंत्रण / तांत्रिक - ऑपरेशन - मुद्रण) आणि कल्याण अधिकारी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Recruitment of various posts in Government of India Currency Note Press)

हेही वाचा: 'या' नऊ क्षेत्रात 2 लाख लोकांना मिळाला रोजगार! एकूण संख्या 3.10 कोटी

असा करा अर्ज

CNP Nashik Road भरती 2022 मध्ये जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cnpnashik.spmcil.com ला भेट देऊन करिअर विभागात दिलेल्या लिंकद्वारे ऍप्लिकेशन पेजवर जाऊ शकतात. या पेजवर उमेदवारांना प्रथम त्यांचे तपशील भरून नोंदणी करावी लागेल आणि नंतर वाटप केलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून, उमेदवार संबंधित पदासाठी त्यांचा अर्ज सबमिट करू शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. SC, ST आणि PWD उमेदवारांना फक्त 200 रुपये शुल्क जमा करावे लागेल.

हेही वाचा: आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 शिक्षक पदांची भरती! अर्जप्रक्रिया सुरू

अर्जाची प्रक्रिया 4 जानेवारीपासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 25 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवारांना शुल्क देखील भरावे लागेल आणि 25 जानेवारीपर्यंत कोणतीही दुरुस्ती करावी लागेल. तथापि, यानंतर उमेदवार 9 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांचे सबमिट केलेले ऑनलाइन अर्ज प्रिंट करू शकतील.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top