

He stresses that respect begins at home and should be reflected in schools, workplaces and every aspect of social life.
Sakal
विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
सध्याच्या जगात एक गोष्ट दुर्दैवाने लोप पावत चालली आहे ती म्हणजे, ‘एकमेकांविषयीचा आदर.’ समाजात सध्याच्या काळात आदराची भावना क्वचितच अनुभवास येत आहे. या परिस्थितीला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सामाजिक परिस्थितीपासून ते मुलांच्या संस्कारांपर्यंत अनेक घटक यामध्ये समाविष्ट झाले आहेत. खालील काही प्रसंग त्याची जाणीव करून देतात.