esakal | NATA 2021 Result : आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल 14 एप्रिलला; 'या' दिवशी होणार दुसरी परीक्षा

बोलून बातमी शोधा

NATA 2021 Result : आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल 14 एप्रिलला; 'या' दिवशी होणार दुसरी परीक्षा

NATA 2021 Result : आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे (सीओए) देशभरातील आर्किटेक्चर संस्थांत बॅचलर डिग्री कोर्समध्ये (2021-22) प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांच्या निवडी घेण्यात आल्या होत्या. त्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

NATA 2021 Result : आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल 14 एप्रिलला; 'या' दिवशी होणार दुसरी परीक्षा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सातारा : आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे (सीओए) देशभरातील आर्किटेक्चर संस्थांत बॅचलर डिग्री कोर्समध्ये (2021-22) प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांच्या निवडी घेण्यात आल्या होत्या. त्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सीओएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एनएटीए 2021 च्या पहिल्या परीक्षेचा निकाल 14 एप्रिल 2021 रोजी जाहीर केला जाईल, तर एनएटीएमध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक परीक्षा पोर्टल, nata.in वर प्रसिद्ध झाल्यानंतरच पाहता येणार आहे. एनएटीएची पहिली चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्याचबरोबर सीओएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15066 उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 14310 उमेदवार परीक्षेस बसले होते.

असा पहा NATA 2021 चा निकाल

एनएटीएचा निकाल आणि स्कोअर कार्ड पाहण्यासाठी उमेदवारांनी निकालाच्या लिंकवर क्लिक करून त्या अधिकृत संकेतस्थळावर (nata.in) आपला तपशील (ईमेल आयडी आणि पासवर्ड) भरावा. त्यानंतर नवीन निकाल पृष्ठावर माहिती सबमिट करावी.

SSC Selection Post Phase 8 Result : एसएससी सिलेक्शन पोस्टचा असा पहा Result; एका क्लिकवर मिळेल

12 जून रोजी होणार दुसरी चाचणी

सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, एनटीए 2021 अंतर्गत दुसरी परीक्षा 12 जून 2021 रोजी घेतली जाईल. दरम्यान, सर्व परीक्षार्थी जे पहिल्या चाचणीसाठी नोंदणी करूनही कोविड किंवा इतर कोणत्याही कारणास्तव उपस्थित होऊ शकले नाहीत अथवा पहिल्या परीक्षेच्या निकालावर समाधानी नाहीत, अशा उमेदवारांना दुसर्‍या परीक्षेला बसण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

NIIT PG :अशा पद्धतीने द्यावी लागेल परीक्षा, नियमावली ठरली

आर्किटेक्चर इन नॅशनल एप्टीट्यूड टेस्टमध्ये (एनएटीए) यशस्वी झालेल्या उमेदवारांना आर्किटेक्चर कौन्सिलशी संलग्न देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आर्किटेक्चर (बीआर्क) पदवी अभ्यासक्रमात 5 वर्षाच्या बॅचलर्समध्ये प्रवेश दिला जाईल, असेही सीओएने स्पष्ट केले आहे.